नागपुरात ज्येष्ठ नागरिकाचे पैसे सायबर गुन्हेगारांनी पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:56 PM2020-01-15T23:56:21+5:302020-01-15T23:57:32+5:30

सायबर गुन्हेगारांनी निवृत्त अधिकाऱ्यासह दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांची १.५० लाखाने फसवणूक केली आहे.

Senior citizen's money run by cyber criminals in Nagpur | नागपुरात ज्येष्ठ नागरिकाचे पैसे सायबर गुन्हेगारांनी पळविले

नागपुरात ज्येष्ठ नागरिकाचे पैसे सायबर गुन्हेगारांनी पळविले

googlenewsNext
ठळक मुद्देदीड लाख लंपास

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी निवृत्त अधिकाऱ्यासह दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांची १.५० लाखाने फसवणूक केली आहे. पहिली घटना प्रतापनगर ठाण्यांतर्गत घडली. दीनदयालनगरातील रहिवासी सत्यनारायण चॅटर्जी (८१) यांना ६ जानेवारीला मोबाईलवर कथित पेटीएमचा मॅसेज आला. चॅटर्जी यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेत खाते आहे. दोन्ही खाते पेटीएमशी संलग्न आहे. मॅसेज आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने चॅटर्जी यांना फोन केला. त्याने पेटीएम बंद होणार असल्याची बतावणी केली. त्याने चॅटर्जी यांना टीम व्ह्यु अ‍ॅप पाठविण्यास सांगितले. त्याने अ‍ॅप डाऊनलोड केल्यास पेटीएम बंद होणार नसल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून चॅटर्जी यांनी आपल्या नातवाला मोबाईल दिला. त्यांच्या नातवाने फोन करणाऱ्याने सांगितल्यानुसार टीम व्ह्यु अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक अर्ज आला. फोन करणाऱ्याने अर्जात दिलेली माहिती भरण्यास सांगितली. त्यात बँक खात्यांची माहिती होती. चॅटर्जी यांच्या नातवाने आधी एसबीआय आणि नंतर एचडीएफसी खात्याची माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी आला. चॅटर्जी यांच्या नातवाने ओटीपी सांगण्यास नकार दिला. त्यानंतरही त्यांच्या दोन्ही खात्यातून ६४ हजार रुपये उडविले. त्यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक तसेच आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. अमरनगर मानेवाडा येथील रहिवासी सुखदेव भेरे (६९) यांचे उदयनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियात खाते आहे. २१ नोव्हेंबरला अज्ञात आरोपीने त्यांच्या खात्यातून ६० हजार रुपये उडविले. या प्रकरणातून ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्हेगारांचे शिकार होत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Senior citizen's money run by cyber criminals in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.