वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शन उल्हासनगरात नशेखोराविरोधात महिलांचा लढा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 05:08 PM2021-07-27T17:08:53+5:302021-07-27T17:09:29+5:30
Crime News : महिलांचे एक पथक तैनात करून त्यांना मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर यांनी मार्गदर्शन केले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील सम्राट अशोकनगर मधील नगरसेवक, समाजसेवक, महिला व नागरिकांनी एकत्र येत नशेखोरा विरोधात एक लढा. असे आंदोलन उभे केले. त्यासाठी महिलांचे एक पथक तैनात करून त्यांना मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर यांनी मार्गदर्शन केले.
उल्हासनगरसह सम्राट अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावर पार्किंग केलेल्या गाड्यांमध्ये बसुन काही नशेखोर तरुण दारू, अंमली पदार्थाचे सेवन करणे, जोरजोराने ओरडणे, शिवीगाळ करणे, महिला व तरुणींना छेडणे. आदी प्रकारात वाढ झाल्याचा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला. अशा वाईट कृत्याला आळा घालण्यासाठी रगडे यांनी सम्राट अशोकनगर येथून एक लढा नशेखोराविरोधात आंदोलनाची सुरवात केली. त्यासाठी त्यांनी स्थानिक नगरसेवक, समाजसेवक, महिला व नागरिकांना विश्वासात घेऊन एक लढा नशेखोरा विरोधात असे आंदोलन सुरू केले. महिला पथकासह नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरवाडकर यांना मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी बोलाविले होते. सुरवाडकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे स्वागत करून शहरातील प्रत्येक विभागात असा लढा उभे राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून पोलीस तुमच्या सोबत असणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
एक लढा नशेखोरा विरोधात या मार्गदर्शन कार्यक्रमाला समाजसेवक शिवाजी रगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर, रिपाइं नेते महादेव सोनवणे, नगरसेविका सविता तोरणे-रगडे, यांच्यासह दशरथ चौधरी, गौतम ढोके, रामेश्वर गवई, सुनील खांडेकर, प्रविण वासनिक यांच्यासह स्त्रीशक्ती पथकांच्या महिला, नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. त्यावेळी या लोकलढयात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवाजी रगडे यांनी केले.