पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 08:58 PM2019-06-14T20:58:15+5:302019-06-14T20:59:29+5:30

१३  वर्षांच्या शाळकरी अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

seniour citizen raped on Minor girl at Kodi in Purandar taluka | पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार

पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देकोडीत गावातील वस्तीवर धनगर समाजाचे कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी पाल टाकून उतरले होते

सासवड : पुरंदर तालुक्यातील कोडीत येथे एका १३  वर्षांच्या शाळकरी अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोडीत येथील ही ऊघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांच्या मध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीस कठोर शासन व्हावे अशी मागणीही होत आहे. 
    कोडीत गावातील वस्तीवर धनगर समाजाचे कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी पाल टाकून उतरले होते.  दि.१०  जूनला सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मेंढपाळ कुटुंबातील १३  वर्षांची मुलगी पालाबाहेर खेळत होती. याच सुमारास आरोपी राजू बडदे हा तेथे दुचाकीवरून आला. त्याने शेतातून स्प्रिंकलर मशीन आणायचे आहे. मशीन धरून बसण्यासाठी तू माझ्या बरोबर चल, असे सांगत या मुलीला दुचाकीवरून शेतात घेऊन गेला. शेतात गोठ्यावर दुचाकी उभी करून तिला शेजारच्या चारीत स्प्रिंकलर मशीन आहे, ती घेऊन यायला सांगितले. ती चारीत गेल्यानंतर आरोपीने तिच्या पाठीमागे जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला कोणाला सांगितलंस तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. नंतर पीडित मुलीला पालाजवळच्या रस्त्यावर सोडून दिले.

घाबरलेल्या या मुलीने आपल्या घरी बहीण व आईला हा घडलेला प्रकार सांगितला. मुलीचे वडील बाहेरगावी गेले असल्याने घाबरून त्यांनी कोणाकडे ही याची वाच्यता केली नाही. गुरुवारी सायंकाळी वडील घरी आल्यानंतर त्यांना झाला प्रकार सांगितला. वडिलांनी मुलीला घेऊन थेट सासवड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. सासवड पोलिसांनी आरोपी राजू बापूराव बडदे (वय- ५५ , रा. कोडीत, पुरंदर) याला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.यापूवीर्ही कोडीत मध्ये अशीच घटना घडली होती. त्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. कोडीत गावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून बलात्कार, गावठी कट्टे, विनयभंग, खून आदी घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत असून पोलिसांनी त्वरीत यावर कारवाई करावी अशी मागणी देदेखील ल ग्रामस्थांमधून होत आहे.

Web Title: seniour citizen raped on Minor girl at Kodi in Purandar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.