घृणास्पद कृत्यानंतर प्रशासनात खळबळ, कोर्टाच्या आवारात घडली बलात्काराची घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 05:08 PM2020-06-23T17:08:45+5:302020-06-23T17:11:32+5:30
न्यायालयात घडलेल्या या घृणास्पद कृत्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली - २२ जून रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील राउस एवेन्यू कोर्टात काम करणाऱ्या व्यक्तीने कोर्टाच्या आवारातच एका महिलेसोबत बलात्काराची घटना घडवून आणली. न्यायालयात घडलेल्या या घृणास्पद कृत्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आरोपीविरूद्ध बलात्काराच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी राजेंद्रला अटक केली आहे.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला काही प्रकरणात न्यायालयात यावे लागत होते. आरोपीने राऊस एव्हेन्यू कोर्टातील कोर्ट नंबर 308 च्या रेस्ट रूममध्ये ही घृणास्पद घटना घडवून आणली. दिल्ली पोलीस या खळबळजनक घटनेचा सखोल तपास करत आहेत. अशी माहिती झी न्यूजने दिली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष
धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार
६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती
मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला
मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार
पुढच्या महिन्यात पोरीचं लग्न, देवाखातर उघड्यावर आणू नका; ...म्हणून वडिलांना दहशतवाद्यांपुढे जोडावे लागले हात