खळबळजनक! पाकिस्तानात गुरुद्वारावर हल्ला केल्यानंतर शीख तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:02 PM2020-01-05T17:02:02+5:302020-01-05T17:05:31+5:30

चमकानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळला आहे.

Sensational! 25-year-old Sikh youth murdered in Pakistan | खळबळजनक! पाकिस्तानात गुरुद्वारावर हल्ला केल्यानंतर शीख तरुणाची हत्या

खळबळजनक! पाकिस्तानात गुरुद्वारावर हल्ला केल्यानंतर शीख तरुणाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देरविंदर सिंग असे हत्या झालेल्या 25 वर्षीय शीख तरुणाचे नाव आहे. पेशावर येथे शॉपिंगसाठी आला असतानाच त्याची हत्या करण्यात आली. रविंदर मलेशियाला राहत होता.

नवी दिल्ली - पाकिस्तानातील पेशावर येथे एका शीख तरुणाची अज्ञात व्यक्तीने हत्या केली असून चमकानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे भारतात एकच खळबळ माजली आहे. रविंदर सिंग असे हत्या झालेल्या 25 वर्षीय शीख तरुणाचे नाव आहे.

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचे जन्मस्थळ असलेल्या पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यानंतर आता शीख या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानने अशी कृत्यं करणे थांबवावे आणि हे निर्घृण कृत्य करणाऱ्यास अटक करण्याची आणि योग्य ती शिक्षा करण्याची त्वरित कारवाई करावी असे आवाहन पाकिस्तानला केले आहे. नानकाना साहिब येथील गुरुद्वारा श्री जनमस्थानच्या अलीकडील तुच्छतेने होणारी तोडफोड आणि अपमान, शीख मुलीचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न करणे या प्रकरणांचा तपास न होणे  याचा भारत तीव्र निषेध करतो, असे देखील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


नानकाना साहिब गुरुद्वारावर पाकिस्तानी नागरिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा पाकिस्तान आणि भारतातील शीख नागरिकांनींनी तीव्र निषेध केला आहे. पेशावरमध्ये रविंदर सिंग या शीख तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने हा भारत - पाकिस्तान वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. चमकानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविंदरचा रविवारी मृतदेह सापडला. रविंदर मलेशियाला राहत होता. पेशावर येथे शॉपिंगसाठी आला असतानाच त्याची हत्या करण्यात आली. 

Web Title: Sensational! 25-year-old Sikh youth murdered in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.