परमबीर सिंगांवर पुन्हा खळबळजनक आरोप; विरारच्या व्यावसायिकाने केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 10:07 PM2021-05-06T22:07:22+5:302021-05-06T22:19:12+5:30
Parambir Singh : दिलीप वळसे पाटील यांनी ह्या प्रकरणात तक्रारदारांची तक्रारीची दखल घेतल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर दिवसेंदिवस नवनवीन आरोप केले जात आहेत. आता विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी परमबीर सिंग यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. नुकताच क्रिकेट बुकी सोनूने आरोप केला. त्यानंतर विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी परमबीर सिंग यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप केला आहे. २०१७ साली पोलिसांनी घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आदेश दिल्याचा आरोप करणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंगही दिवसेंदिवस अधिकच अडचणीत सापडत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
परमबीर सिंग यांच्यासह माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा, पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रारीचे सत्र अद्याप थांबलेले नसून सुरुच असल्याचे दिसत आहे.राऊत यांची कार मनसुखसारख्या प्रकरणात वापर होण्याची तक्रारदार राऊत यांनी भीती होती. त्यामुळे न्यायासाठी त्यांना याबाबत डीजीपी आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले. दिलीप वळसे पाटील यांनी ह्या प्रकरणात तक्रारदारांची तक्रारीची दखल घेतल्याची माहिती मिळत आहे.
Param Bir Singh: "आमचा रोल संपला, आता उच्च पातळीवर चौकशी सुरू"; अखेर परमबीर सिंगांवर गुन्हा दाखल
परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खळबळजनक वक्तव्य
विरारचे व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. pic.twitter.com/wvhxH3Jb96
— Lokmat (@MiLOKMAT) May 5, 2021
ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. यासोबतच परमबीर सिंग यांच्यासह ३३ पोलीस अधिकाऱ्यांनी भीमराज घाडगे यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भीमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. २०१६ मध्ये कल्याण येथे ही घटना घडली होती. त्यावेळी बापू रोहोम हे तेथे निरीक्षक पदावर कार्यरत होते. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह ३३ अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.