खळबळजनक! कल्याणमध्ये मुलाने केली वयोवृद्ध आईची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 20:39 IST2019-09-04T20:38:52+5:302019-09-04T20:39:12+5:30
आरोपी अमनची मानसिक स्थिती ठीक नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

खळबळजनक! कल्याणमध्ये मुलाने केली वयोवृद्ध आईची हत्या
कल्याण - वयोवृद्ध आई रुकसाना मुल्ला (50) हिची पोटच्या मुलाने हत्या केली आहे. हत्या करणारा मुलगा अमन (28) याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्याण पश्चिमेकडील भोईवाडा येथील गफूर पॅलेस सोसायटीमध्ये ही खळबळजनक घटना आज सायंकाळी घडली आहे. आरोपी अमनची मानसिक स्थिती ठीक नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अमनने ज्यावेळी त्याच्या आईवर हल्ला केला तेव्हा त्याची वहिनी आणि दोन पुतणे घरातच होते. अमनचा रुद्र अवतार बघताच त्याच्या वहिनीने मुलांसह घराबाहेर धाव घेतली. शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती बाजारपेठ पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अमनला ताब्यात घेतले. अमन याची मानसिक स्थिती ठीक नसल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस पुढील तपास करत आहेत.