मर्डर केसमध्ये झालेला अजब खुलासा पाहून पोलिसही झाले हैराण, वाचा काय आहे पूर्ण प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 10:31 AM2021-06-02T10:31:30+5:302021-06-02T10:31:36+5:30
काही दिवसांपूर्वी संभलमधून एक कलिंगड विकणारा अचानक गायब झाल्याचं समजलं होतं. जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तर खुलासा झाला की, त्या कलिंगड विक्रेत्याची हत्या करण्यात आली.
उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये एका हत्येचा खुलासा झाला तर पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने जे केलं ते समजल्यावर सगळेच हैराण झाले. जेव्हा या हत्याकांडाबाबत आरोपीने जे सांगितलं ते जाणून घेतल्यावर तुम्हीच काय पोलिसही थक्क झाले. काही दिवसांपूर्वी संभलमधून एक कलिंगड विकणारा अचानक गायब झाल्याचं समजलं होतं. जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तर खुलासा झाला की, त्या कलिंगड विक्रेत्याची हत्या करण्यात आली.
कलिंगड विकणाऱ्या व्यक्तीची हत्या त्याच्या प्रेयसीच्या भावाने केली होती. आरोपीने तरूणाचा मृतदेह कुठेही न फेकतो तो जुन्या स्मशानभूमीत नेऊन ठेवला. जुन्या स्मशानभूमीत कुणी मृतदेह लपवेल याचा कुणालाही अंदाज आला नसता. इतकंच नाही तर पोलिसांना जर मृतदेह सापडला तरी ते मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय मृतदेहाच्या जवळही जाऊ शकत नाहीत. (हे पण वाचा : मामीसोबत सुरू होतं बापाचं अफेअर, मुलाने संपत्तीसाठी सुपारी देऊन काढला काटा...)
असे सांगितले जात आहे की, कलिंगड विकणाऱ्या १८ वर्षीय नदीमचं अपहरण आणि हत्या ही घटना मुसापूरमध्ये घडली. त्याच्या परिवारानुसार २७ मे रोजी तो कलिंगड विकता विकता अचानक बेपत्ता झाला होता. यासंबंधी तक्रार पोलिसातही देण्यात आली होती. पोलिसांनी तपास करत या केसचा उलगडा केला. पोलिसांनी तरमीम नावाच्या तरूणाला अटक केली. जेव्हा पोलिसांनी आरोपीची चौकशी केली तर त्याने सांगितलं की, त्याने नदीमचा मृतदेह एका कबरीत लपवून ठेवला. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्ड म्हटल्या जाणाऱ्या महिलेनेच केल मेहुल चोकसीचं अपहरण? सीक्रेट ऑपरेशनमध्ये अडकला चोकसी!)
एसपी चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, नदीमचं गावातील एका तरूणीसोबत प्रेमप्रकरण होतं. तरूणीच्या भावाने नदीम आणि बहिणीला मक्याच्या शेतात पाहिलं होतं. तेव्हाच बहिणीला घरी पाठवून त्याने नदीमची हत्या केली आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत एका कबरीत लपवून ठेवला होता. मॅजिस्ट्रेटच्या परवानगीनंतर पोलिसांनी नदीमचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला. हत्येचा आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.