खळबळजनक! एलटीटी परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 19:43 IST2019-11-22T19:37:39+5:302019-11-22T19:43:40+5:30
अन्य एका आरोपीचा पोलीस माग काढत असल्याची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

खळबळजनक! एलटीटी परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक
मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) परिसरात उत्तर प्रदेशातील कानपूर येथून मुंबईत आलेल्या महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य एका आरोपीचा पोलीस माग काढत असल्याची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली आहे. पीडित महिला उत्तर प्रदेशातील कानपूर येथील असून ती एक्स्प्रेसने मुंबईत आली होती. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे दिपू गौतम (२६) आणि अब्दुल शेख (२५) अशी असून त्यांना लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती कांबळे यांनी दिली. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. तर अन्य एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. अलीकडेच चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका औरंगाबादहून आलेल्या मुलीवर बलात्कार झाला होता.