खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने केला महिलेवर सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 04:26 PM2020-04-17T16:26:23+5:302020-04-17T16:29:35+5:30
पोलिसांनी आरोपी दीर आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध एफआयआर नोंदवून अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे नोएडा जिल्ह्यातील एका खासगी कंपनीत काम करणारी एक महिला अडकली आहे. या महिलेला घरी जायचे होते. अडचणीत अडकलेल्या महिलेला तिच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी कॅबमध्ये बसवले आणि सूरजपूर पोलिस स्टेशन परिसरातील तिलपत्ता कंटेनर डिपोजवळ नेऊन तिच्यावर कॅबमध्ये सामूहिक बलात्कार केला. तसेच महिलेला ठार मारण्याची धमकी दिली घरी पोहोचल्यावर महिलेने आपल्या पतीला घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी दीर आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध एफआयआर नोंदवून अटक करण्यात आली आहे.
सुरजपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या महिलेच्या तक्रारीनुसार, जारचा येथे राहणारी एक महिला नोएडामधील एका फॅक्टरीत काम करते. ती नोएडामध्ये भाड्याने राहते. तिचे कुटुंब जारचा येथे राहते. लॉकडाऊनमध्ये महिला नोएडामध्ये अडकली. त्याचा मोठा भाऊ संदीपने महिलेला तिच्या घरी पाठविण्याचे आमिष दाखवून तिचा दीर संदीपने तिला जाळ्यात ओढले मंगळवारी नोएडामध्ये घरी कॅबने आश्वासन दिलं. संदीपने त्याचा साथीदार आकाशलाही वाटेत कॅबमध्ये घेतले.
सूरजपूरमधील तिलपत्ता कंटेनर डिपोजवळ पोचल्यानंतर आरोपींनी कॅबमध्येच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. महिलेने प्रतिकार केल्यावर तिला ठार मारण्याची धमकी दिली. डीसीपी सेंट्रल नोएडा हरीशचंदर यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संदीप आणि आकाश या दोघांना अटक केली. दोघेही नोएडाच्या सेक्टर 51 मध्ये भाड्याने राहत होते. पोलिस आरोपींकडे चौकशी करत आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलेचा दीर संदीप याला यापूर्वी २०१५ मध्ये हत्येप्रकरणी तुरुंगात टाकले डांबले होते.