खळबळजनक! राहत्या घरी ISRO च्या शास्त्रज्ञाचा आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 02:58 PM2019-10-02T14:58:34+5:302019-10-02T14:59:33+5:30
याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
हैदराबाद - हैदराबाद येथील अमीरपेठमध्ये राहत्या घरी ISRO च्या शास्त्रज्ञाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. एससार सुरेश कुमार (५८) असं या शास्त्रज्ञाचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस पोचले असून त्यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ओस्मानिया रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
५८ वर्षीय एसआर सुरेश कुमार यांचे कुटुंब चेन्नईत राहते. कुटुंबीयांनी सुरेश यांच्यासोबत फोनद्वारे संपर्क साधला होता. त्यानंतर घरच्यांना संशय आल्याने त्यांनी सुरेश यांच्या मित्रांना सावध करण्यासाठी कॉल केला. मित्र सुरेश यांच्या घरी पोचले असता आतून दरवाजा बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर मित्रांनी दरवाजा तोडला. दरवाजा तोडून आत गेल्यानंतर सुरेश हे मृत अवस्थेत मित्रांना आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, केरळ येथे राहणारे सुरेश गेल्या २० वर्षांपासून हैदराबाद येथे राहत होते. पोलीस उपायुक्त एस. सुमित यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता कार्यालयातून पावसात भिजून घरी आले होते. मंगळवारी सकाळी सकाळी त्यांचं घर आतून बंद असल्याचे आढळून आले. सुरेश हे ISRO च्या NRSC - नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते.
Hyderabad Police: SR Suresh Kumar, who was working as a scientist at National Remote Sensing Centre (NRSC) of ISRO, found dead at his residence in Ameerpet. Body shifted to Osmania hospital for post mortem. Investigation is underway pic.twitter.com/EZFvSHM8JR
— ANI (@ANI) October 2, 2019