खळबळजनक! क्षुल्लक वादावरून प्रेयसीची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 21:32 IST2020-02-20T21:30:25+5:302020-02-20T21:32:06+5:30
जखमी सतीमाला उपचारा करता रुग्णालयात दाखल केले.

खळबळजनक! क्षुल्लक वादावरून प्रेयसीची केली हत्या
मीरारोड - भाच्याला घरी बोलावण्यास विरोध केल्याच्या वादातून प्रेयसीची हत्या केल्या प्रकरणी नवघर पोलिसांनी प्रियकरास अटक केली आहे. मुर्शिद दिनअली शेख उर्फ मुन्ना (27) व सतीमा महंतो दास (33 ) यांच्यात प्रेमसंबंध होते. सतीमा हिच्या मामे बहिणीचा मुलगा मुंबईला सतीमाकडे राहण्याकरता येणार होता. मात्र, मुर्शीद याने त्यास नकार दिला व त्याला इकडे येण्यास मनाई करावी असे सतीमाला सांगितले. त्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण, शिविगाळ झाली.
संतापलेल्या मुर्शीद याने घरातील चाकूने तिच्या पोटावर, डाव्या कानावर, हातावर वार केले . सदर घटना मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास नवघरच्या दत्त मंदिर जवळील रमेश नगर भागात घडली. जखमी सतीमाला उपचारा करता रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नवघर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक देवरे करत आहेत.