खळबळजनक! झोमॅटो डिलिव्हरी बॉयची चाकूने भोसकून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 19:13 IST2020-02-19T19:11:35+5:302020-02-19T19:13:35+5:30

दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशला पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना कुर्ला स्थानकावरून अटक केली आहे.

Sensational! So murdered of Zomato delivery boy in powai | खळबळजनक! झोमॅटो डिलिव्हरी बॉयची चाकूने भोसकून केली हत्या 

खळबळजनक! झोमॅटो डिलिव्हरी बॉयची चाकूने भोसकून केली हत्या 

ठळक मुद्दे अमोल सूरतकर या डिलीव्हरी बॉयची या दोघांशी या ठेल्यावरून वाद झाला. फळ विक्रेता सचिन सिंह आणि त्याचा साथीदार हरिरामने एका हॉटेलच्या बाहेर फळाची हातगाडी लावली होती.

मुंबई - पवईमध्ये क्षुल्लक कारणावरून एका फळविक्रेत्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशला पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना कुर्ला स्थानकावरून अटक केली आहे.



रात्री साडे बारा वाजता फळ विक्रेता सचिन सिंह आणि त्याचा साथीदार हरिरामने एका हॉटेलच्या बाहेर फळाची हातगाडी लावली होती. त्यावेळी अमोल सूरतकर या डिलीव्हरी बॉयची या दोघांशी या ठेल्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसन मोठ्या भांडणात झाले. तेव्हा सचिन सिंहने चाकूने अमोलला भोसकले. या हल्ल्यात अमोलच्या हृदयावर आणि पोटात गंभीर जखमा झाल्या. त्यावेळी त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: Sensational! So murdered of Zomato delivery boy in powai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.