खळबळजनक! स्वतःचा गळा चिरून केली भररस्त्यात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 19:53 IST2020-02-18T19:48:08+5:302020-02-18T19:53:51+5:30
घटनेची माहिती हिललाईन पोलिसांनी मिळाल्यावर पंचनामा करत मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविले आहे.

खळबळजनक! स्वतःचा गळा चिरून केली भररस्त्यात आत्महत्या
उल्हासनगर - कॅम्प नं-5 भाटिया चौकात एका इसमाने सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान तुटलेल्या काचेच्या बॉटलने गळा चिरून आत्महत्या केली. घटनेची माहिती हिललाईन पोलिसांनी मिळाल्यावर पंचनामा करीत मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविले आहे.
उल्हासनगर भाटिया चौकातील एका बिअरबार मधून बाहेर आलेल्या एका अज्ञात इसमाने बिअरची बॉटल तोडली. तुटलेल्या काचेच्या बॉटलने स्वतःचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इसमाचा भररस्त्यात तडफडून मृत्यू झाला. हिललाईन पोलिसांना माहिती मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेउन मृतदेह ताब्यात घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी पंचनामा करीत मृतदेह मध्यवर्ती रूग्णालय पाठविला. इसमाच्या नातेवाईक व कुटुंबाचा शोध घेत आहेत. तसेच बारमध्ये मृत इसमासोबत काही घडले काय? याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.