खळबळजनक! युवकाची चाकूने भोसकून केली हत्या; फेकून दिला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 20:00 IST2020-02-06T19:57:09+5:302020-02-06T20:00:29+5:30
जांब रोडवर; ओळख पटली नाही

खळबळजनक! युवकाची चाकूने भोसकून केली हत्या; फेकून दिला मृतदेह
यवतमाळ : येथील जांब रोडवर वन उद्यानाच्या संरक्षण भिंतीलगत ३० ते ३२ वयोगटातील युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर चाकूचे घाव केल्याचे स्पष्टपणे दिसत होते. यावरून हा खूनच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या युवकाची ओळख पटविण्याचे काम अवधूतवाडी पोलीस करीत आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता परिसरातील व्यक्तीला हा मृतदेह आढळून आला.
जांब रोडवर वन उद्यानाच्या संरक्षण भिंतीलगत बेवारस मृतदेह पडून असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम हाती घेतले. त्या युवकाचा खून करताना मारेकऱ्यांनी चाकूचे वार केल्यानंतर दगडाने पूर्ण चेहरा ठेचून काढला. त्यामुळे ओळख पटविणे आणखीच कठीण झाले आहे. रस्त्यापासून काही अंतरावर हा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंगावरील कपडे व वयाच्या वर्णनावरून बेपत्ता युवकांचे मिळते जुळते वर्णन यावरून शोध घेतला जात आहे. हा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.