Video:उबर चालकाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 06:02 PM2018-10-13T18:02:34+5:302018-10-13T18:04:41+5:30

बरचे वाढीव कामाचे तास आणि कमी वेतन यांमुळे त्रस्त असल्याने तिवारी यांनी आत्महत्या केल्याचे जितेंद्र यांनी दावा केला असून या मृत्यूस उबर जबाबदार असून उबरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. 

Sensing the body of the driver, the excitement was found in the area | Video:उबर चालकाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ   

Video:उबर चालकाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ   

Next

मुंबई - अंधेरी -कुर्ला रोडवरील टाईम्स स्वेकर इमारतीसमोर पार्क केलेल्या कारमध्ये मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. उबर चालक पुरणचंद तिवारी (वय ४२) यांचा हा मृतदेह असल्याचे त्यांच्याकडे सापडलेल्या वाहन परवान्यावरून उघडकीस आले आहे. याबाबत सहार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

उबरच्या कारचे चालक म्हणून पूरणचांद काम करत होते. त्याच्या पश्चात त्यांची पत्नी आणि चार मुले आहेत. हे कुटुंब कुर्ला पश्चिम येथील गांधी नगर येथे राहते. पुरणचंद यांचा कुजलेला मृतदेह अंधेरी -कुर्ला रोडवर असल्याची माहिती सहार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला असून तिवारी यांचे सहकारी व मित्रमंडळी यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असल्याची माहित तिवारी यांचे मित्र जितेंद्र केसरवाणी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. उबरचे वाढीव कामाचे तास आणि कमी वेतन यांमुळे त्रस्त असल्याने तिवारी यांनी आत्महत्या केल्याचे जितेंद्र यांनी दावा केला असून या मृत्यूस उबर जबाबदार असून उबरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. 

Web Title: Sensing the body of the driver, the excitement was found in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.