देवेंद्र फडणवीस यांना ५ ते ६ वेळा नोटीस पाठवली, आरोपी म्हणून नाही - दिलीप वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 02:30 PM2022-03-13T14:30:50+5:302022-03-13T14:38:24+5:30

Dilip Walse-patil : आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही, जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवली. त्यांच्याशिवाय तपास थांबला होता म्हणून आता जबाब नोदवला असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.  

Sent notice to Devendra Fadnavis 5 to 6 times, not as accused - Dilip Walse-Patil | देवेंद्र फडणवीस यांना ५ ते ६ वेळा नोटीस पाठवली, आरोपी म्हणून नाही - दिलीप वळसे-पाटील

देवेंद्र फडणवीस यांना ५ ते ६ वेळा नोटीस पाठवली, आरोपी म्हणून नाही - दिलीप वळसे-पाटील

Next

मुंबई - पोलीस बदली अहवाल लीक प्रकरण आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत माहिती दिली आहे. मुंबई पोलीस एसआयटी मधून हा डाटा बाहेर कसा गेला आणि त्याला जबाबदार कोण याची चौकशी करणार आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंत पाच ते सहा वेळा नोटीस पाठवण्यात आली होती. आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही, जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवली. त्यांच्याशिवाय तपास थांबला होता म्हणून आता जबाब नोदवला असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.  

 

पुढे वळसे पाटील म्हणाले की, मुंबईमध्ये सायबर सेल विभागात गुन्हा२०२१ मध्ये  नोंद  झाला आणि डेटा बाहेर कसा गेला हा विषय आहे याची चौकशी सुरु आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (आयटी ऍक्ट) हा गुन्हा दाखला झाला आहे. आतापर्यंत २४ साक्षीदार यांची साक्ष घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मत जाणून घेण्यासाठी नोटीस पाठवली. पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसीत गैर काही नाही. देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटिसीप्रकरणी आदळ-आपट करण्याची गरज नाही. भाजप राजकीय भांडवल करतंय असा आरोप वळसे पाटील यांनी केला. 

एसआयडीमधून डाटा बाहेर गेल्याप्रकरणी पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. फोन टॅपिंगप्रकरणी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीकेसी पोलिस ठाण्याचे पोलिस फडवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचले. सहाय्यक पोलिस आयुक्त, वांद्रे सायबर विभाग, नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनखाली तीन पोलीस अधिकारी सागर बंगल्यावर आले. देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणी जवळपास दोन तास चौकशी करण्यात आली.

Web Title: Sent notice to Devendra Fadnavis 5 to 6 times, not as accused - Dilip Walse-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.