पत्नीचा अश्लील व्हिडीओ पाठवला सासूला; लालची पतीने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने केले दुष्कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 06:48 PM2021-07-08T18:48:21+5:302021-07-08T18:51:11+5:30

Dowry Case : पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आहे. 

Sent objectionable video of wife to mother-in-law; greedy husband committed a crime by not fulfilling the demand for dowry | पत्नीचा अश्लील व्हिडीओ पाठवला सासूला; लालची पतीने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने केले दुष्कृत्य

पत्नीचा अश्लील व्हिडीओ पाठवला सासूला; लालची पतीने हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने केले दुष्कृत्य

Next
ठळक मुद्देलग्नानंतर नवरा तिला गुजरातला घेऊन गेला. तिथे नवऱ्याने तिच्यावर अनैतिक दुष्कर्म केल्याचा आरोप आहे. प्रतिकार केल्यावर पीडित तरुणीला मारहाण करण्यात आली आणि तिला समुद्रात फेकण्याची धमकी देण्यात आली.

 

हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने नवऱ्याने आपल्या सासूच्या मोबाइलवर पत्नीचा अश्लिल व्हिडिओ पाठविला पीडितेने कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा  दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना उत्तराखंडच्या हरिद्वार येथील आहे. 


लग्नाच्या वेळी पीडितेच्या आईने बऱ्याच वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. सिडकुल पोलिस ठाण्याचे प्रभारी लखपतसिंग बुटोला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने फेब्रुवारी २०२१ रोजी मुरादाबादच्या पकबरा भागात राहणाऱ्या रिझवान याच्याशी झाला होता असल्याचे सांगितले. विवाहित महिलेने सांगितले की, लग्नाच्या वेळी तिच्या आईने भेट म्हणून पुष्कळ सामान दिले होते.


आक्षेप घेतल्यानंतर पीडितेला मारहाण केली गेली
लग्नानंतर नवरा तिला गुजरातला घेऊन गेला. तिथे नवऱ्याने तिच्यावर अनैतिक दुष्कर्म केल्याचा आरोप आहे. प्रतिकार केल्यावर पीडित तरुणीला मारहाण करण्यात आली आणि तिला समुद्रात फेकण्याची धमकी देण्यात आली.

विवाहितेचा आरोप - यापूर्वी पतीने लग्न केले होते
असा आरोप केला जात आहे की, गुजरातहून परत आल्यावर तिची मेहुणी अरमाना, मेहुणा उस्मान आणि पती रिजवान यांनी तिच्यावर अनेक वेळा प्राणघातक हल्ला केला. विवाहित महिलेचा आरोप आहे की, पतीने यापूर्वी लग्न केले आहे. पहिली पत्नी दिल्लीत राहते. विवाहित महिला सासरच्यांनी वैतागली आणि हरिद्वार येथील आपल्या माहेरी आली. त्यानंतर तिच्या नवऱ्याने एक लाख रुपयांची मागणी केली.

पोलिसांनी तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही म्हणून न्यायालयात जावे लागले
पैसे न मिळाल्याने पतीने तिच्या आईच्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाठवले आणि त्यांना व्हायरल करण्याची धमकीही दिली. पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तेव्हा त्यांना न्यायालयात जावे लागले. पोलिस स्टेशनचे प्रभारी लखपतसिंग बुटोला यांनी सांगितले की, कोर्टाच्या आदेशानुसार पती रिजवान, मेहुणे उस्मान आणि मेव्हणी अरमानाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे.


विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याने सासू आणि पतीवर हुंडाबळीचा गुन्हा 
अल्मोडा येथे आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणात तिच्या सासू आणि तिच्या पतीच्या विरोधात लामगडा पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लमगाडा ब्लॉकच्या माल्टा गाव येथील केशव राम यांची पत्नी गायत्री देवी (वय 24) यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. नातेवाईकांनी सांगितले की, केशवला गायत्रीचा मृतदेह गळफास घेतलेलय अवस्थेत आढळला. 108 च्या मदतीने तिला महिला हॉस्पिटल अल्मोडा येथे आणण्यात आले. जेथे डॉक्टरांनी गायत्रीला मृत घोषित केले. 
 

येथे सोमवारी गायत्रीची सासू माल्टा निवासी सल्ली देवी (वय 52) आणि पती केशव राम यांच्याविरूद्ध लामगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लामगाडाचे एसएचओ सुनीलसिंग बिष्ट यांनी सांगितले की, मृताचे मामा बागेश्वर येथील रहिवासी महेश रामच्या तक्रारीवरून या दोघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: Sent objectionable video of wife to mother-in-law; greedy husband committed a crime by not fulfilling the demand for dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.