प्रेयसीचा विरह सहन होईना, युवकानं गळफास घातलेला सेल्फी कुटुंबाला आणि मित्रांना पाठवला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 02:48 PM2021-06-06T14:48:35+5:302021-06-06T16:46:55+5:30
या युवकाच्या प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न झालं. जेव्हा ही गोष्ट प्रियकराला समजली तेव्हा त्याला हे सहन झालं नाही.
हमीरपूर – उत्तर प्रदेशच्या हमीरपूर येथे ह्द्रयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एका युवकाने पहिल्यांदा गळ्यात फास घातलेला सेल्फी घेतला आणि त्यानंतर हा फोटो घरच्यांना तसेच मित्रांना पाठवला. त्यानंतर युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा सेल्फी पाहून कुटुंबामध्ये खळबळ माजली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर कुटुंब, पोलिसांना एका झाडाला लटकलेला या युवकाचा मृतदेह सापडला. प्रेमसंबंधातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.
या युवकाच्या प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न झालं. जेव्हा ही गोष्ट प्रियकराला समजली तेव्हा त्याला हे सहन झालं नाही. प्रेयसीच्या विरहात युवकाने एका शेतात जाऊन तेथील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हमीरपूरच्या कोतवाली परिसरातील जखेडी गावातील ही घटना आहे. या गावात राहणारा १९ वर्षीय लक्ष्मी प्रसाद प्रजापती हा राजस्थानच्या अलवार येथे एका फॅक्टरीत नोकरीला होता. त्याच्या आत्याचे नातेवाईक महोबा येथे राहतात.
पोलिसांनी ६ जणांच्या मुसक्या आवळल्या, सातव्या आरोपीचा शोध सुरू @MumbaiPolicehttps://t.co/HXPzcZqViW
— Lokmat (@MiLOKMAT) June 6, 2021
याचठिकाणी राहणाऱ्या एका युवतीवर युवक प्रेम करत होता. या युवतीसोबत लग्न करण्याची त्याची इच्छा होती. परंतु दोघांचे कुटुंब यांच्या प्रेमाला विरोध करत होते. शुक्रवारी लक्ष्मी प्रसाद राजस्थानहून परतून बसने घरी येत होता. तेव्हा कोणीतरी त्याला तुझ्या प्रेयसीचं लग्न झालं अशी माहिती दिली. प्रेयसीच्या लग्नाची बातमी ऐकताच युवक प्रचंड दु:खी झाला. त्याला ही गोष्ट सहन झाली नाही. तो ललपुरा परिसरात येणाऱ्या स्वासा येथे बसमधून रस्त्यातच उतरला आणि शेतात जाऊन आत्महत्या केली.
दोन्ही बहिणीचं लग्न झालं नव्हतं. लग्नाचा विषय काढला की त्या दोघीही आधी करिअर करायचं आणि नंतर लग्न असं म्हणत होत्या. #Policehttps://t.co/9HduS9RSuD
— Lokmat (@MiLOKMAT) June 6, 2021
याबाबत स्थानिक पोलीस अधिकारी ओमप्रकाश यादव म्हणाले की, मृतकाचे वडील राकेश प्रजापती आणि नातेवाईक लक्ष्मी प्रसादच्या मोबाईलवरून आलेला मेसेज पाहून घाबरलेल्या अवस्थेत गावच्या परिसरात त्याचा शोध घेत होते. परंतु त्याची कोणतीच खबर न लागल्याने अखेर रात्री उशीरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांना या घटनेचा शोध घेत घटनास्थळी पोहचले. ज्याठिकाणी युवकाने एका झाडाला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृतक युवकाच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या फोनमधून पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर शनिवारी युवकाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला होता.
चिमुकल्याला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला होता. मनसेनं या महिलेचा शोध घेतला अन्... @PapadkarManisha@mnsadhikruthttps://t.co/1Lv1PQJCg7
— Lokmat (@MiLOKMAT) June 6, 2021