विमानाने चोरी करायला जात होती महिला, आतापर्यंत 100 घरांमधील दागिने केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 03:42 PM2022-08-19T15:42:47+5:302022-08-19T15:43:04+5:30
UP Crime News : गाझियाबाद पोलिसांनी महिलेला बुधवारी अटक केली. महिला घरकामाच्या निमित्ताने घरांमध्ये शिरत होती. त्यानंतर दागिने चोरी करून फरार होत होती.
UP Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी एका असा सीरिअल महिला चोराला अटक केली आहे जिने आतापर्यंत 100 घरांमध्ये चोरी केली. NCR भागातच या महिलेने आतापर्यंत 26 चोऱ्या केल्या आहेत. आरोपी महिलेने चोरीच्या पैशातून दिल्लीत एक प्लॉट खरेदी केला आणि त्यावर घरही बांधलं. पोलिसांनी सांगितलं की, महिलेचे संपत्ती जप्त केली जाईल.
गाझियाबाद पोलिसांनी महिलेला बुधवारी अटक केली. महिला घरकामाच्या निमित्ताने घरांमध्ये शिरत होती. त्यानंतर दागिने चोरी करून फरार होत होती. आरोपी महिलेचं नाव पूनम शाह उर्फ काजल आहे. ती बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील राहणारी आहे. पूनमने दिल्ली, जोधपूर, कोलकाता आणि गाझियाबादसहीत वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन चोऱ्या केल्या. इतकंच नाही तर महिला जेव्हा दुसऱ्या शहरांमध्ये चोरी करण्यासाठी जात होती तेव्हा ती विमानाने प्रवास करत होती.
पोलिसांनी सांगितलं की, काजलने गाझियाबादमध्ये विपुल गोयलच्या घरात कथितपणे 10 लाख रूपयांचे दागिने चोरी केले. याची पोलिसात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांना काजलवर संशय आला आणि त्यांनी तिला तिला आम्रपाली व्हिलेज सोसायटीमधून अटक केली. तिच्याकडून 3 लाख रूपयांचं सोनं ताब्यात घेण्यात आलं.
पोलिसांनी सांगितलं की, चौकशी दरम्यान काजलने सांगितलं तिने तिचा साथीदार बंटीच्या मदतीने चोरीचे प्लान केले होते. प्लाननुसार, काजलने विपुल गोयलच्या पत्नीला बोलण्यात फसवलं आणि बंटीने कपाटातून दागिने चोरी केले होते. त्यानंतर दोघेही एका रिक्षातून सोसायटीमधून पळून गेले. चोरी केलेले दागिने त्यांना वाटून घेतले.
महिला विपुलच्या घरी घरकाम करण्यासाठी आली होती. याआधी ती दिल्लीत उत्तम नगरमध्ये राहत होती. काजलने मान्य केलं की, तिने चोरीच्या पैशातून दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये एक प्लॉट खरेदी केला आणि चोरीचे दागिने विकून त्यावर घर बांधलं.
महिलेने हेही सांगितलं की, तिने कमीत कमी 100 घरांमध्ये चोरी केली. महिलेने सांगितलं की, ती दुसऱ्या शहरांमध्ये चोरी करायला जात होती तेव्हा विमानाने प्रवास करत होती. पोलिसांनी सांगितलं की, महिलेच्या अवैध संपत्तीला जप्त केलं जाईल आणि गॅंगस्टर अॅक्टनुसार तिच्यावर कारवाई केली जाईल. तिचा साथीदार बंटी सध्या फरार आहे. त्याला लवकरच पकडलं जाईल.