पोलिसांनी दंडुका मारल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी; आयसीयूत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 08:08 PM2019-05-22T20:08:29+5:302019-05-22T20:16:08+5:30
पोलिसांविरुद्ध तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप जखमीच्या आई व भावाने केला आहे.
नाशिक : पोलिसांनी दुचाकी चालकाच्या डोक्यात दंडुका मारल्याने युवक गंभीर जखमी होऊन त्याला अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांविरुद्ध तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप जखमीच्या आई व भावाने केला आहे.
शुभम ज्ञानेश्वर महाले हा युवक दुचाकीवरून नाशिकरोड येथून द्वारकेकडे जात होता. दरम्यान, हेल्मेट सक्ती तपासणीकरीता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांकडून या दुचकीस्वाराला काठी डोक्यात मारण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. रक्तस्त्राव होऊन महाले कोसळला आणि तो बेशुद्ध झाल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. ही घटना सिन्नर फाटा पोलीस चौकी समोर घडली. त्यावेळी सोबत त्याचा भाऊदेखील होता. दुचाकी थांबवली नाही म्हणून पोलिसाने पाठीमागून येऊन डोक्यात काठी मारली शुभम हा देवळाली गाव येथे राहणारा आहे.