सराफाचा ६० लाखांचा ऐवज घेवून पसार झालेला नोकर जाळ्यात, चेंबूर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 06:23 PM2023-03-14T18:23:11+5:302023-03-14T18:27:19+5:30
चेंबूर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मुंबई : सरफाचे ५० लाखांचे दागिने आणि १० लाखांची रोकड घेवून पसार झालेल्या नोकराला चेंबूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चेंबूर पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तक्रारदार यांचा चेंबूर परिसरात सोन्याचे दागिने तयार करण्याचा कारखाना आहे. दागिने तयार केल्यानंतर त्यांच्याकडे काम करणारा सुरेश गुर्जर (२५) हा नोकर दागिने दुकानदारांना पोहचवत होता. आठ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे त्याच्याकडे पन्नास लाख रुपये किमतीचे दागिने आणि दहा लाख रुपये रोख दुकानदारांना देण्यासाठी दिले होते. मात्र दागिने, पैसे बघितल्यानंतर त्याची नियत फिरली. आणि तो नॉट रिचेबल झाला. अखेर, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवला.
चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तयार केली. या पथकांनी त्याच्या शेवटच्या मोबाइल लोकेशनवरून त्याला नवीमुंबई येथून ताब्यात घेतले. तपासात त्याच्याकडून पोलिसांनी सर्व सोन्याचे दागिने हस्तगत केले असून दहा लाख रुपये खर्च केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. याबाबत त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.