भयानक! कारसह भाजपा नेत्याला दिले पेटवून; डिक्कीत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:39 PM2021-08-11T20:39:37+5:302021-08-11T20:52:42+5:30
BJP leader's body found in Dikki : हा नेता त्याच्या कारने जात असतानाच अनोळखी व्यक्तींनी त्याची कार पेटवून दिली.
तेलंगणमधील मेडक जिल्ह्यात येथील एका स्थानिक भाजपा नेत्याची अगदी क्रूरपणे कोंडून आणि जाळून हत्या करण्यात आली आहे. हा नेता त्याच्या कारने जात असतानाच अनोळखी व्यक्तींनी त्याची कार पेटवून दिली. यामध्ये होरपळून या नेत्याचा मृत्यू झाला आहे. संबंधित प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती मिळाली आहे.
Telangana | A local BJP leader in Medak District died after he was set ablaze by unidentified persons. A case has been registered.
— ANI (@ANI) August 10, 2021
"Few persons set him on fire along with his car. We found his burnt body in the trunk of his car," said Chandana Deepti, SP, Medak (10.08) pic.twitter.com/wdmEyThavf
डॅडीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर; नागपूर खंडपीठाचा निर्णयhttps://t.co/wSRDzYMg88
— Lokmat (@MiLOKMAT) August 11, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी या नेत्याला त्याच्याच कारच्या डिक्कीमध्ये कोंडलं. त्यानंतर या लोकांनी गाडीला पेटवून दिले. आम्हाला या गाडीच्या डिक्कीमध्ये मृतदेह आढळून आला आहे, अशी माहिती मेडकचे पोलीस निरिक्षक चंदना दिप्ती यांनी दिली आहे.
तपासात पोलिसांना निष्पन्न झालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव व्ही. श्रीनिवास प्रसाद असं आहे. प्रसाद हे भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष होते. पोलिसांनी प्रसाद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या शवविच्छेदन अहवालामधून समोर आलेल्या माहितीच्या आधारे चौकशीला मदत होणार आहे. या प्रकरणात दोषींना लवकरात लवकर अटक करु असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.