झवेरी बाजारातून एक कोटीच्या रोकडसह सहा किलो सोने जप्त; सराफासह चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 09:02 PM2018-12-21T21:02:34+5:302018-12-21T21:05:35+5:30
दिपक रमेशलाल गिरला ( रा. उल्हासनगर), रिदमल गंगाराम परियार ( रा. रिद्धी सिद्धी बिल्डिंग, भुलेश्वर), प्रकाश देवीचंद सोनी उर्फ प्रविण ( रा. आरएनपी पार्क, काशी विश्वनाथ मंदिर, भाईंदर), व नितीन राठोड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याची बिस्कीटं बनविण्याचे साहित्य, साचे जप्त करण्यात आले आहे.
मुंबई - दुबईतून तस्करी करुन आणलेले सोने मुंबईत भारतीय बनावटीची म्हणून खपविणारे रॅकेट महसुल गुप्तचर महासंचालनालयाच्या पथकाने (डीआरए) आज उध्वस्त केले आहे. झवेरी बाजार येथील एका दुकानावर छापा टाकून एक कोटीच्या रोकडसह चार किलो सोन्याची बिस्कीटे व बार जप्त केले. याप्रकरणी सुवर्ण व्यावसायिकासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
दिपक रमेशलाल गिरला ( रा. उल्हासनगर), रिदमल गंगाराम परियार ( रा. रिद्धी सिद्धी बिल्डिंग, भुलेश्वर), प्रकाश देवीचंद सोनी उर्फ प्रविण ( रा. आरएनपी पार्क, काशी विश्वनाथ मंदिर, भाईंदर), व नितीन राठोड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्याची बिस्कीटं बनविण्याचे साहित्य, साचे जप्त करण्यात आले आहे. रिदमल परियार याचे झवेरी बाजारमध्ये मुंबई ज्वेलर्स नावाचे दुकान असून तो तस्करीतील सोन्याचे बिस्कीट बनवित होता.
गेल्या काही महिन्यापासून दुबईतून सोन्याची तस्करी करुन भारतीय बनावटीची सोन्याची बिस्कीट बनविली जात होती, याबाबत झवेरी बाजार येथील अन्य काही व्यावसायिक रडारवर असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. झवेरी बाजार येथील मोतीशा चाळीत काम करीत असलेल्या प्रकाश सोनी उर्फ प्रविण याने तस्करीतून आयात केलेल्या सोन्याच्या बारमधून काही बिस्कीट बाळगली असल्याची माहिती डीआरएच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्याठिकाणी छापा टाकल्यानंतर १५ सोन्याचे बार मिळाले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील परियार याच्या दुकानात छापा टाकून पथकाने एक कोटी १ लाख २६ हजारची रोकड तसेच एकूण ६.०२२ किलो सोन्याचे बार व बिस्कीटे जप्त केली. दुबईतून सोने आणल्यानंतर ते मुंबईत वितळविले जात होते. त्यानंतर ‘मेड इन इंडिया’ नावाने बिस्कीटे बनविली जात होते. याप्रकरणी राठोड याला जामीन मिळाला आहे तर अन्य तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
डीआरआयची मोठी कारवाई : झवेरी बाजारातून एक कोटीच्या रोकडीसह सहा किलो सोने जप्त; सराफासह चौघांना अटक pic.twitter.com/vNaw9xqHyr
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 21, 2018