मराठवाड्यात सात खून; नांदेडमध्ये शिवाचार्य महाराजांची हत्या, तर बीडमध्ये ट्रिपल मर्डर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 10:25 AM2020-05-25T10:25:09+5:302020-05-25T11:16:45+5:30
बीड शहरात पतीने पत्नीसह दोन मुलांची क्रूर हत्या केली, तर लातूर जिल्ह्यात क्वारंटाईनच्या वादातून दोघांची हत्या झाली.
औरंगाबाद/नांदेड/लातूर : सर्वत्र कोरोनाची दहशत असताना रविवारी सात खुनांनी मराठवाडा हादरला. उमरी (जि. नांदेड) तालुक्यातील नागठाणा बु. येथे शिवाचार्य पशुपतिनाथ महाराज (३३) यांच्यासह अन्य एकाची एका माथेफिरूने निर्घृण हत्या केली.
बीड शहरात पतीने पत्नीसह दोन मुलांची क्रूर हत्या केली, तर लातूर जिल्ह्यात क्वारंटाईनच्या वादातून दोघांची हत्या झाली. उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील मठाचे मठाधिपती शिवाचार्य पशुपतिनाथ महाराज यांची शनिवारी मध्यरात्री हत्या झाल्याने देशभरात खळबळ उडाली. यापूर्वी पालघर जिल्ह्याच्या सीमेवर दोन साधूंची झालेली हत्या देशात चर्चेचा विषय बनला होता.
आरोपी साईनाथ लिंगाडे हा याच गावचा रहिवासी असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो चोरीच्या उद्देशाने मठाच्या छतावरून शिवाचार्य महाराजांच्या खोलीत घुसला. मोठ्या कापडी रुमालाने त्याने महाराजांचा गळा आवळून खून केला़ मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये टाकून कारसह पळून जाण्याच्या तयारीत असताना मठाच्या बाहेर निघताना कार (एमएच-२६ बीक्यू-१८००) गेटमध्ये अडकली. त्यामुळे छतावरील झोपलेले लोक जागे झाले. लोकांनी मठामध्ये महाराजांचा शोध घोतला. तोपर्यंत आरोपीने पळ काढला. या घटनेपूर्वी त्याने भगवान रामराव शिंदे (२, रा. चिंचाळा ता. उमरी) याचाही खून केला. तेलंगणातील तानूर पोलिसांनी त्याला अटक केली.
- बीड शहरात पतीने पत्नीसह दोन मुलांची क्रूर हत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या केल्याची कबुली पती संतोष कोकणे याने दिली असून, त्याला अटक करण्यात आली आहे. संगीता संतोष कोकणे (३५), सिद्धेश कोकणे (१३) बल्लू ऊर्फ कल्पेश कोकणे (९), अशी मृतांची नावे आहेत.
- लातूर जिल्ह्यात उत्तर प्रदेशमधून आलेल्या तात्याराव बरमदे यास तू शेतात जाऊन राहा, असा सल्ला दिल्यामुळे राग आल्याने त्याने व त्याच्या साथीदारांनी शहाजी किसन पाटील (५०), वैभव बालाजी पाटील (२४) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात ते दोघेही गतप्राण झाले. ही घटना लातूर जिल्ह्यातील बोळेगाव (ता. निलंगा) येथे रविवारी पहाटे घडली. याप्रकरणी ८ जणांना अटक केली.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : धक्कादायक! केस कापायला गेले अन् कोरोना घेऊन आले; तब्बल 91जण पॉझिटिव्ह झाले
CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती
सुपरफास्ट तंत्रज्ञान! फक्त एका सेकंदात तब्बल 1000 चित्रपट डाऊनलोड; इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड
CoronaVirus News : बापरे! आईच्या आजारपणाचं खोटं कारण देऊन पास मिळवला, रेड झोनमध्ये गेला अन्...