बाईकवर सात जण चालले होते, ट्रॅफिक पोलिसांनी थांबवले तर उत्तर दिले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 08:37 PM2022-07-12T20:37:29+5:302022-07-12T20:43:42+5:30
Traffic Police : पोलिसांकडून दुचाकीचे चलान कापण्यात आले आणि दुचाकी चालवणाऱ्या तरुणांनाही पुन्हा असे न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ऑटोमध्ये बसलेल्या २७ प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता औरैयामध्ये दुचाकीवर बसलेल्या सात जणांना पोलिसांनी रोखले आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्रॅफिक पोलिसांनी बाईकवर असलेल्या सात जणांना एकत्र बसण्याबाबत जाब विचारल्यावर सगळे एकत्र म्हणाले... सर, आपण आईस्क्रीम खायला बाहेर आलो आहोत. यावर उपस्थित सर्व लोक हसले. पोलिसांकडून दुचाकीचे चलान कापण्यात आले आणि दुचाकी चालवणाऱ्या तरुणांनाही पुन्हा असे न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाईकच्या पुढे आणि मागे लहान मुले बसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते हे सर्वांनाच माहीत नाही. सामान्यत: शासन व प्रशासनाच्या वतीने लोकांना वेळोवेळी वाहतुकीचे नियम पाळण्याचे सल्ले दिले जातात, त्यावर मोठा खर्चही केला जातो. असे असूनही, लोक निष्काळजीपणे वाहतुकीचे नियम मोडण्यात बहाद्दूर असतात.
वाहतूक नियमानुसार दुचाकीवर दोनच लोक बसू शकतात. तसेच दोघांनी हेल्मेट परिधान केलेले असावे. मात्र, या व्यक्तीने दुचाकीवर 7 जणांना बसवून सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी दुचाकीस्वाराला तुम्ही कुठे जात आहात, अशी विचारणा केली. तेव्हा दुचाकीस्वार मोठ्या आनंदाने म्हणाला की, आम्ही आईस्क्रीम खायायला जात आहोत.