लैंगिक अत्याचाराला फुटली सात वर्षाने वाचा; पोलिसांनी नराधमास ठोकल्या बेडया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 06:17 PM2021-10-15T18:17:25+5:302021-10-15T18:18:11+5:30

Rape Case : 2014 ला पिडीताचे कुटुंब तिच्यासह एका नातेवाईकाच्या घरी काही दिवसाकरीता राहण्यास गेले होते.

Seven years after sexual harassment broke out; The police handcuffed accused | लैंगिक अत्याचाराला फुटली सात वर्षाने वाचा; पोलिसांनी नराधमास ठोकल्या बेडया

लैंगिक अत्याचाराला फुटली सात वर्षाने वाचा; पोलिसांनी नराधमास ठोकल्या बेडया

Next
ठळक मुद्देअखेर याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर अत्याचार करणा-या 64 वर्षीय नातेवाईकाला पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.

कल्याण:  सात वर्षाच्या मुलीवर तिच्या जवळच्या नातेवाईकानेच लैगिंक अत्याचार केल्याची धककादायक घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे सात वर्षानंतर पिडीताने तिच्यावर झालेल्या अत्याचाराविषयीची माहिती कुटुंबाला दिली. सात वर्षे ही मुलगी मानिसक दबावाखाली होती. अखेर याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर अत्याचार करणा-या 64 वर्षीय नातेवाईकाला पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. पिडीत मुलीचे वय सध्या 14 वर्षे आहे.


2014 ला पिडीताचे कुटुंब तिच्यासह एका नातेवाईकाच्या घरी काही दिवसाकरीता राहण्यास गेले होते. तेव्हा संबंधित नातेवाईकाने त्या मुलीवर काही वेळा लैगिंक अत्याचार केला होता. ही गोष्ट अन्य कोणाला सांगितल्यास तुङया लहान बहीणीसोबत देखील लैगिंक अत्याचार करेल अशी धमकी त्या मुलीला देण्यात आली होती. सात वर्षापासून पिडीत मुलगी प्रचंड मानिसक दबावाखाली होती. तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराची तिने भिती पोटी कुठेही वाच्यता केली नव्हती. मानसिक तणावात ती कमी बोलायची. सतत विचारात मग्न राहायची. तीची एकुणच स्थिती पाहता तिच्या मोठया बहिणीने तिला विश्वासात घेत तिला विचारणा केली असता लैंगित अत्याचाराचा प्रकार समोर आला.  सध्या आरोपी पोलिस कोठडीत आहे. तब्बल सात वर्षानंतर या प्रकरणाला वाचा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Seven years after sexual harassment broke out; The police handcuffed accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.