सतरा लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त ; नारपोली पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 04:18 PM2020-11-23T16:18:26+5:302020-11-23T16:18:52+5:30

Illegal Chemical Storage seized : नारपोली पोलिसांनी हा संपूर्ण अवैध केमिकल साठा जप्त करून मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Seventeen lakh illegal chemical stocks seized; Narpoli police action | सतरा लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त ; नारपोली पोलिसांची कारवाई

सतरा लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त ; नारपोली पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देचंद्रकांत अण्णा देशमुख वय ५८ रा . नवी मुंबई असे अवैध केमिकल साठवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव

भिवंडी - भिवंडीतील खोणी मिठापाडा येथे अवैध केमिकल साठा केलेल्या गोदामाला तीन दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना घडली होती . त्यानंतर भिवंडीत अशा प्रकारे अनेक ठिकाणी गोदामांमध्ये अवैध पद्धतीने केमिकलचा साठवणूक होत असलेल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून या व अशा अवैध केमिकल साठ्यांविरोधात पोलीस व महसूल प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची ओरड सुरु असतांनाच नारपोली पोलिसांनी पूर्णा येथील महालक्ष्मी वेअरहाऊस पटवर्धन कंपाउंड येथील गेला नंबर पाचमध्ये केमिकलचा अवैध साठा केला असल्याची खबर नारपोली पोलिसांना लागताच पोलिसांनी याठिकाणी शनिवारी छापा मारला असता याठिकाणाहून  १७ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे २८० कार्बोचे तसेच १४५ लोखंडी ड्रम असे विविध प्रकारचे अत्यंत ज्वलनशील केमिकलचा अवैध साठा केल्याचे आढळून आल्याने नारपोली पोलिसांनी हा संपूर्ण अवैध केमिकल साठा जप्त करून मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
           

चंद्रकांत अण्णा देशमुख वय ५८ रा . नवी मुंबई असे अवैध केमिकल साठवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव असून केमिकल साठवणुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही शासकीय परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक के आर पाटील करीत आहेत.

Web Title: Seventeen lakh illegal chemical stocks seized; Narpoli police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.