सेक्स रॅकेट उध्वस्त; पोलिसांनी गिऱ्हाईक बनून टाकला छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:27 PM2019-08-15T15:27:18+5:302019-08-15T15:32:01+5:30
मॉलमध्ये सुरु होता स्पाच्या नावाखाली गोरखधंदा
गुरुग्राम - पालम विहार येथील अंसल प्लाझा मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या अवैध शरीरविक्रीचा गोरखधंदा पोलिसांनी उध्वस्त केला आहे. पोलिसांना अंसल प्लाझा मॉलमध्ये स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याठिकाणी सापळा रचून छापा टाकण्यात आला. या कारवाईत जवळपास २५ जणांना अटक करण्यात आली. त्यात १५ महिलांचा समावेश आहे.
संशयितांसह स्पा मालकाच्याविरोधात पालम विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंसल प्लाझा येथे सुरु असलेल्या स्पा सेंटर म्हणून पोलीस एक ग्राहक बनून गेला होता. तसेच स्पा सेंटरच्याबाहेर इतर पोलिसांना सापळा लावला होता. स्पा सेंटरमध्ये गिऱ्हाईक बनून गेलेल्या पोलिसाला रूममध्ये महिला पुरुषांना मसाज करत असून आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या. पोलिसाला सेक्स रॅकेटबाबत सुगाव लागताच त्याने बाहेर असलेल्या पोलीस पथकाला याबाबत टीप दिली. त्यानुसार पोलिसांनी या स्पा सेंटरवर छापा टाकत २५ जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये १५ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती गुरुग्राम पोलीसांचे प्रवक्ते सुभाष बोकन यांनी माहिती दिली.