कुंटनखान्यावर छापा; देहविक्रय करणाऱ्या चार तरुणी पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:47 PM2018-10-02T13:47:15+5:302018-10-02T13:50:19+5:30
अकोला: गोरक्षण रोडवरील अंबिका नगरमधील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी छापा टाकला.
अकोला: गोरक्षण रोडवरील अंबिका नगरमधील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी छापा टाकला. या फ्लॅटमधून चार युवतींसह एका ग्राहकाला रंगेहात पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले, तर दुसरा ग्राहक पोलिसांना पाहून पळून जाण्यात यशस्वी झाला.
पुसद येथील रहिवासी प्रीती महादेव कुरील व महादेव कुरील या दाम्पत्याने अकोल्यातील गोरक्षण रोडवरील अंबिका नगरमध्ये एक फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला. त्यानंतर या फ्लॅटमध्ये युवतींकडून देहव्यापार करून घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांना मिळाली. यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक छाया वाघ यांच्या नेतृत्वात एक पथक गठित केले. या पथकाने अंबिका नगरमध्ये सापळा रचला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांना एका प्लॅटमध्ये ग्राहक जाताना दिसताच पोलिसांनी तेथे छापा टाकला. या ठिकाणावरून पोलिसांनी चार युवती व ग्राहक नको त्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी युवती व ग्राहकाला ताब्यात घेतले आहे, तर एक ग्राहक फरार झाला. त्यांच्याकडून पोलिसांनी आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत. चार युवती, कुंटनखाना चालवणारी महिला प्रीती महादेव कुरील, महादेव कुरील अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
युवती २० वर्ष वयोगटातील
देहव्यापारात गुंतलेल्या युवती या १८ ते १९ वर्ष वयोगटातील आहेत. जुने शहर, कौलखेड व आदर्शनगर येथील या युवती आहेत. हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत ग्राहकांकडून पैसे घेऊन त्याबदल्यात त्या देहव्यापार करीत असल्याची माहिती समोर आली आहे, तर प्रीती महादेव कुरील व तिचा पती महादेव कुरील हे दोघे कुंटनखाना चालवत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.