नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, रशियन बालेसह तिघींना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:07 AM2019-09-30T05:07:21+5:302019-09-30T05:07:53+5:30
देहव्यापाराच्या धंद्यातील अट्टल गुन्हेगार, कुख्यात सचिन काशीनाथ सोनारकर आणि दीपेश दिलीपभाई कानाबार या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांनी पुन्हा एकदा भंडाफोड केला.
नागपूर : देहव्यापाराच्या धंद्यातील अट्टल गुन्हेगार, कुख्यात सचिन काशीनाथ सोनारकर आणि दीपेश दिलीपभाई कानाबार या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांनी पुन्हा एकदा भंडाफोड केला. या दोघांकडून चालविण्यात येणाºया पॉश कुंटणखान्यावर छापा मारून सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) एका रशियन बालेसह तिघींना ताब्यात घेतले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरनगरात असलेल्या डीके लॉज अॅन्ड रेस्टॉरेंटमध्ये शनिवारी एसएसबीच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली.
सचिन सोनारकर हा या गोरखधंद्यातील सराईत गुन्हेगार असून तो अनेक वर्षांपासून सेक्स रॅकेट चालवितो. त्याच्याकडे देश-विदेशातील शेकडो वारांगनांची यादी असून तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना बोलवून घेतो. सोनारकरकडे आंबटशौकिन धनिक मंडळी, बुकींचीही मोठी यादी असून या ग्राहकांना तो पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या महानगरातील वारांगना उपलब्ध करून देतो. सचिनच्या वेगवेगळ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली आहे. कोतवालीत दीपेश कानाबारच्या मदतीने डीके लॉज अॅन्ड रेस्टॉरेंटमध्ये पॉश कुंटणखाना सुरू केल्याची माहिती कळल्यानंतर एसएसबीचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी सायंकाळी तेथे छापा मारला. पोलिसांना तेथे तीन वारांगना आढळल्या. त्यातील एक रशियन (किरगिझस्तान), दुसरी आसाम तर तिसरी रायपूर, छत्तीसगडची आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हा कुंटणखाना चालविण्यास सोनारकर आणि कानाबारला मदत करणारे अंकित किशोर वाहने (वय १९, रा. भांडे प्लॉट), राजेश हरिश्चंद्र गोखे (वय ३५, रा, बापूकुटीनगर, पाचपावली) यांनाही एसएसबीने सहआरोपी केले. या चौघांविरुद्ध भादंविच्या कलम ३७० तसेच
अनैतिक प्रतिबंधक कायद्याच्या सहकलम ३, ४, ५, ७ अन्वये गुन्हा दाखल केला.