नागपुरातील हॉटेल क्रिष्णामध्ये सेक्स रॅकेट : पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 10:34 PM2020-02-04T22:34:02+5:302020-02-04T22:35:49+5:30
अत्यंत वर्दळीच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळच्या हॉटेल क्रिष्णामध्ये पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा घातला. यावेळी पोलिसांना तेथे कॉन्ट्रॅक्टवर आणलेल्या दोनपैकी एक परप्रांतिय सेक्स वर्कर ग्राहकाशी भलत्याच लीला करताना आढळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अत्यंत वर्दळीच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळच्या हॉटेल क्रिष्णामध्ये पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा घातला. यावेळी पोलिसांना तेथे कॉन्ट्रॅक्टवर आणलेल्या दोनपैकी एक परप्रांतिय सेक्स वर्कर ग्राहकाशी भलत्याच लीला करताना आढळली. तिला, तिच्यासोबत असलेल्या आणि या दोघींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
गणेशपेठ बसस्थानकानजिक फ्लॅगशिप क्रिष्णा ओयो हॉटेल आहे. येथे अहमदनगरचा रहिवासी असलेला आरोपी रेहान ऊर्फ रमजान पटेल (वय ३०) हा पिंटू ऊर्फ किशोर भीमराव कांबळे (वय ३५) याच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवित असल्याची कुणकुण गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला (एसएसबी) लागली. त्याची शहानिशा करून घेतल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी क्रिष्णा हॉटेलमध्ये पोलिसांनी आपला पंटर पाठवला. त्याने पिंटू कांबळेची भेट घेतली. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील वेश्या उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवित आरोपी पिंटूने प्रति तासाला पाच हजार रुपये मागितले. तेथेच रूमही उपलब्ध करून दिली. पंटरच्या रूममध्ये वारांगना शिरताच पिंटूने त्याच्याकडून पाच हजार रुपये घेतले. त्याचवेळी पोलिसांनी तेथे छापा मारून पिंटूला, पंटरच्या ताब्यातील आणि बाजूच्या रूममध्ये असलेल्या वारांगनेला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकल्याने हॉटेलमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्याचा फायदा उठवत आरोपी रेहान पळून गेला. पोलिसांनी आरोपी रेहान आणि पिंटूविरुद्ध गणेशपेठ ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पिंटूला अटक करण्यात आली तर रेहानचा शोध घेतला जात आहे.
पुन्हा वळवळ सुरू !
उपराजधानीत गेल्या काही वर्षांत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचे नेटवर्क चांगलेच वाढले आहे. प्रारंभी ब्युटी पार्लर, मसाज पार्लरमधून हा गोरखधंदा चालायचा. आता जागेसोबतच स्वरूपही बदलले आहे. सेक्स रॅकेट चालविणारी मंडळी मोठमोठ्या हॉटेलमध्ये पॉश रूम बुक करतात. वेगवेगळ्या प्रांतासह रशियन बालाही बोलवून घेतात. १५ दिवस ते १ महिना असा त्यांचा करार असतो. त्यासाठी त्यांना विशिष्ट रक्कम दिली जाते. बदल्यात त्यांच्याकडून दररोज वेश्याव्यवसाय करवून घेत दलाल लाखो रुपये कमवितात. अलिकडे या धंद्यात महिला गुंतल्या आहेत. त्यातील काही पोलिसांच्याही संपर्कात राहतात. प्रतिस्पर्धी व्यावसायिकेची माहिती पोलिसांना देऊन त्या पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:ला सेफ करून घेतात. त्याच तोडपाण्याचीही नंतर व्यवस्था करून घेतात. त्यांच्या मध्यस्थीमुळे एसीबीचाही धोका टळतो. त्यामुळे काही जण अशा महिलांच्या निरंतर संपर्कात राहतात.