बारामतीत उच्चभ्रु परिसरात बंगल्यात चालणारा वेश्याव्यवसाय उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 03:15 PM2019-10-01T15:15:06+5:302019-10-01T15:16:12+5:30
परप्रांतीय मुलीसह २ मुलींची सुटका,दोघांना अटक
बारामती : बारामती शहरातील संभाजीनगर या उच्चभ्रू परिसरात एका बंगल्यात सुरु असणारा वेश्या व्यवसाय ग्रामीण पोलिसांसह बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाने उघडकीस आणला आहे.शहरातील उच्चभ्रु परिसरात बिनबोभाट चालणारा हा व्यवसाय उघड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.या प्रकरणी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.तर एका परप्रांतीय मुलीसह मुलींची सुटका करण्यात आली आहे.सोमवारी (दि ३) भर दिवसा हा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस हवालदार भानुदास छबु बनगर (वय ४७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बारामती येथे अतिशय चांगल्या परिसरात चार ते पाच खोल्या असणाऱ्या बंगल्यामध्ये हा व्यवसाय सुरु होता.अतिशय गोपनीय पद्धतीने, पोलिसांना कुणकुण लागू नये याची काळजी घेऊन बिनबोभाटपणे सुरु होता. स्वत: चे आर्थिक फायद्याकरिता वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची गोपनीय माहिती बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाला मिळाली. त्यानुसार अधिकारी आणि जवान यांनी पंचांसह संबंधित बंगल्यावर छापा घातला .यावेळी आरोपी २ पीडित मुलींकडून स्वत: चे आर्थिक फायद्याकरिता वेश्या व्यवसाय करवून घेताना आढळले आहेत. त्या २ मुलींची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी १ मुलगी उत्तरप्रदेश येथील ,तर १ मुलगी महाराष्ट्राचे बाहेरील तर 1 महाराष्ट्रातील आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक प्रमाणे कायदेशीर करण्यात आली आहे.पोलीसांनी संभाजीनगर येथील ४५ वर्षीय आरोपीसह ३५ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव, बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस हवालदार संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे,शर्मा पवार, राजेन्द्र जाधव, दत्तात्रय मदने ,महिला पोलीस आशा शिरतोडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
—————————————