हॉटेलमध्ये चालविले जात होते सेक्स रॅकेट; गोरखधंद्याचा ठाणे पोलिसांनी केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 08:03 PM2019-01-25T20:03:07+5:302019-01-25T20:07:36+5:30
हॉटेल व्यवस्थापक, कॅशियर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारावाई कापूरबावडी येथील स्वागत लॉज अँड हॉटेलमध्ये काल रात्री करण्यात आली.
ठाणे - हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा गोरखधंदा ठाणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने उघडकीस आणला आहे. या कारवाईत बांग्लादेशींसह १६ मुलींची सुटका करण्यात आली असून हॉटेल व्यवस्थापक, कॅशियर यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारावाई कापूरबावडी येथील स्वागत लॉज अँड हॉटेलमध्ये काल रात्री करण्यात आली.
या करावाईत पोलिसांनी बार व्यवस्थापक दिवाकर सुवर्णा, कॅशियर जगबंधू उर्फ देवा जेना यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे.
कापूरबावडी येथील स्वागत लॉज आणि हॉटेलमध्ये दोन हजारांच्या बदल्यामध्ये मुली पुरविल्या जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्याआधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी रात्री याठिकाणी छापा टाकला.
या दरम्यान, एका बनावट ग्राहकाच्या माध्यमातून या माहितीची खातरजमा करण्यात आली. या प्रकाराची माहिती या गिऱ्हाईकाने या पथकाला मोबाईलवर मिस कॉलद्वारे दिली. त्यानंतर हे धाडसत्र राबविण्यात आले. यात सहा जणांना अटक केली असून १६ मुलींची सुटका केली. यामध्ये सात बांग्लादेशी तरुणींचाही समावेश आहे.