ब्युटी पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट होतं सुरु; तीन मुलींची पोलिसांनी केली सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 10:03 PM2021-06-26T22:03:12+5:302021-06-26T22:04:10+5:30

sex racket : पोलिसांनी धाड टाकताच ब्यूटी पार्लरची संचालिका फरार झाली.

Sex racket started under the name of beauty parlor; Police release three girls | ब्युटी पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट होतं सुरु; तीन मुलींची पोलिसांनी केली सुटका 

ब्युटी पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट होतं सुरु; तीन मुलींची पोलिसांनी केली सुटका 

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक तरुणींना प्रियाने अडकवून ठेवलं होता. ती सौंदर्यानुसार तरुणींची किंमत ठरवत असे.

नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. नोएडा पोलिसांनी ब्यूटी पार्लरच्याआड सुरू असलेल्या देहव्यापाराचा गोरखधंदा उघडीस आणून घटनास्थळावरुन ३ तरुणींची सुटका केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन देहविक्रीसाठी वापरले जाणारे मोबाइलही जप्त केले आहेत. पोलिसांना यावेळी ग्राहकांचा हिशोब ठेवणारे रजिस्टर आणि फोन नंबरच्या दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत.

पोलिसांना सेक्टर ७३ मध्ये ब्युटी पार्लरमध्ये ऑनलाइन सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पथक घेऊन त्यांनी ब्युटी पार्लरमध्ये धाड टाकली. छापेमारी दरम्यान पोलिसांनी येथील ३ पीडित तरुणींची सुटका केली. या मुलींना जबरदस्तीने या अवैध व्यवसायात अडकविण्यात आलं होतं. पोलिसांनी धाड टाकताच ब्यूटी पार्लरची संचालिका फरार झाली.

न्यू लकी पार्लरची मालकीण पायल चौहान उर्फ प्रिया सेक्टर ४९ येथे ब्यूटी पार्लरसह स्पादेखील चालवित होती. लॉकडाऊनमुळे स्पा सेंटर बंद होतं, मात्र ब्यूटी पार्लरचं काम सुरू होतं. आम्ही ब्यूटी पार्लरमध्ये काम करतो. आमच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन जबरदस्ती प्रिया आमच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत होती आणि मोबाईलवरुन मुलींची बुकिंग केली जात होती. आम्हाला ग्राहकांसोबत देहविक्रीच्या हेतूने पाठविलं जात होतं, असे एका पीडित मुलीने सांगितले. अनेक तरुणींना प्रियाने अडकवून ठेवलं होता. ती सौंदर्यानुसार तरुणींची किंमत ठरवत असे.

Web Title: Sex racket started under the name of beauty parlor; Police release three girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.