स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होतं सेक्स रॅकेट, आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 07:45 PM2022-01-02T19:45:16+5:302022-01-02T19:45:44+5:30
Sex Racket : सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. लोकल इंटेलिजन्स युनिट (LIU) च्या अहवालावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजगंज परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात होते. शुक्रवारी संध्याकाळी आग्रा पोलिसांनी ताजगंज परिसरात 6 पुरुष आणि 5 महिलांसह 11 जणांना अटक केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. लोकल इंटेलिजन्स युनिट (LIU) च्या अहवालावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ताजगंज येथील बन्सल नगर येथील एका दुकानात स्पा सेंटरच्या नावाखाली पाच महिन्यांपासून वेश्याव्यवसाय सुरू होता. पकडलेल्या मुली विवाहित आहेत. त्या आग्रा येथील रहिवासी आहे. चौकशीदरम्यान कामासाठी आल्याचे सांगत होत्या. पण, नंतर चूक मान्य करत त्यांनी माफी मागायला सुरुवात केली. सदाकत केंद्रावर व्यवहार करायचे. ग्राहकांशी बोलण्यापासून ते मुलींना दाखवण्याचे काम तो करायचा. आरोपींकडून 48200 रुपये, 10 मोबाईल, दोन रजिस्टर्स आणि गुन्ह्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
लोहमंडीचे सीओ सदर राजीव सिंह यांनी सांगितले की, ताजगंज परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती त्यांना सतत मिळत होती. या माहितीच्या आधारे ही टीम तयार करण्यात आली. ताजगंज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या विभव नगरमध्ये नाव नसलेले स्पा सेंटर सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी येथे छापा टाकण्यात आला. येथून आक्षेपार्ह वस्तू सापडल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस पथकाने 11 जणांना अटक केली असून यामध्ये 6 पुरुष आणि 5 महिला आहेत. या सर्वांविरुद्ध वेश्याव्यवसाय कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी सेक्स रॅकेटचा संचालक सूरज घटनास्थळावरून फरार झाला आहे.