अकोल्यातील पॉश वस्तीत सुरु होते सेक्स रॅकेट...काय झाले पुढे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 10:37 AM2021-08-29T10:37:21+5:302021-08-29T10:37:39+5:30
The sex racket in Akola : हायप्राेफाइल सेक्स रॅकेटवर खदान पाेलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकला़.
अकाेला : खदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गाैरक्षण राेडवर येत असलेल्या आदर्श काॅलनी येथे एका घरात सुरु असलेल्या हायप्राेफाइल सेक्स रॅकेटवर खदान पाेलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकला़. या घरातून दाेन महिलांची सुटका करण्यात आली तर दलालासह चार पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध खदान पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. या अलिशान बंगल्यातून एक लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़.
आदर्श काॅलनीतील अलिशान बंगल्यात माेठ्या प्रमाणात देहव्यापार अड्डा सुरु असल्याची माहिती खदान पाेलिसांना मिळाली़ या माहितीवरुन त्यांनी खातरजमा केल्यानंतर आदर्श काॅलनीतील या अलिशान बंगल्यात एक पंटर पाठविला़ त्यानंतर सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याचा इशारा पंटरने देताच खदान पाेलिसांनी या बंगल्यात छापा टाकला़. या घरातून दाेन महिलांची सुटका करण्यात आली़. तर हा हायप्राेफाइल सेक्स रॅकेट अड्डा चालविणाऱ्या दलालासह चार पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे़. त्यांच्याविरुद्ध खदान पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पाेलिसांनी महिलांची सुटका केली. तर पुरुष आराेपींना न्यायालयासमाेर हजर केल्याची माहिती आहे़ . ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खदानचे ठाणेदार श्रीरंग सनस, सहायक पाेलीस निरीक्षक ठाकरे, सदाशिव मार्के, राजेश वानखडे, धीरज वानखडे, श्रीकृष्ण भारती, इमाम चाैधरी यांनी केली़.
बंगल्यात या युवतीसह हाेते चारजण
आदर्श काॅलनीतील एका बंगल्यात सुरु असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर या घरातून अमरनाथ सीताराम यादव (वय ६८, रा़ आदर्श काॅलनी), सचिन रुपचंद कुटे (वय १९), मनाेज जयंतीलाल परमार (वय ३५, रा़ धामापूर शिरसाेली नाका जळगाव खांदेश, कविता ऊर्फ पूजा विशाल वाघमारे (वय २९, रा़ मुकुंदवाडी अशाेक नगर) या चार जणांना अटक करण्यात आली आहे़ तर या घरातून दाेन पीडितांची सुटका केली आहे़
अड्ड्यावरुन हा मुद्देमाल केला जप्त
आदर्श काॅलनीतील देहव्यापार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पाेलिसांनी ६५ हजार रुपये किमतीच्या दाेन दुचाकी, ४० हजार रुपये किमतीचे ४ माेबाइल, ४ हजार ५०० रुपये राेख असा एकूण एक लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ यासह काही वादग्रस्त साहित्यही पाेलिसांनी जप्त केल्याची माहिती समाेर आली आहे़