सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश! १ कोटींपेक्षा जास्त उकळले पैसे, १९ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 05:23 PM2021-11-09T17:23:02+5:302021-11-09T18:43:33+5:30

Sextortion Exposed : सोशल मीडियावर जाहिराती देऊन महिलांशी मैत्री केल्यानंतर आरोपी अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Sextortion exposed! More than 1 crore victims of cyber crime, 19 arrested | सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश! १ कोटींपेक्षा जास्त उकळले पैसे, १९ जणांना अटक

सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश! १ कोटींपेक्षा जास्त उकळले पैसे, १९ जणांना अटक

googlenewsNext

अलवर - राज्यातील अलवर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक गुन्ह्याची माहिती समोर आली आहे. अलवर जिल्ह्यातील शिवाजी पार्क पोलिस स्टेशनने सेक्सटॉर्शन आणि सायबर फसवणूक करणाऱ्या मेवात टोळीच्या १९ गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने १ कोटींहून अधिक फसवणुकीचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून २६ मोबाईल जप्त केले आहेत. सोशल मीडियावर जाहिराती देऊन महिलांशी मैत्री केल्यानंतर आरोपी अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, भैंसडावत गावाकडून बंधेडीकडे जाणाऱ्या मोकळ्या जागेवर सुमारे २०-२५ जण बसले आहेत. माहिती देणाऱ्याने सांगितले होते की, हे लोक मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील व्हिडिओ चॅट करून लोकांना ब्लॅकमेल करून, वाहनाचे फोटो आणि लष्कराच्या जवानाचे फोटो लोकांना दाखवून OLX वर  ​​फसवणूक करतात. या माहितीवरून इंचार्ज चौकी नसवारीचे एएआय लाखनसिंग आणि रामपाल जप्ता यांच्या मदतीने घटनास्थळी अटक करण्यात आली.


स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल
आरोपी मोबाईलमध्ये व्हॉट्स अ‍ॅपचे  कमर्शियल अकाउंट आणि फोन-पे, गुगल-पे, पेटीएम आणि फेसबुकसारख्या इतर  अ‍ॅप्सवर वेगवेगळ्या नावाने खाते उघडले असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर आरोपींनी पीडितेला व्हॉट्स अ‍ॅप अकाऊंटवरून तरुणीचे न्यूड व्हिडिओ दाखवून भडकावले. त्यानंतर ते त्याच्या स्क्रीनच्या रेकॉर्डर  अ‍ॅपच्या मदतीने स्क्रीन रेकॉर्डिंग करत, त्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देऊन पीडितेला ब्लॅकमेल करून पैशांची फसवणूक करत.

जाहिरातींच्या नावाखाली फसवणूक
OLX आणि इतर सोशल साईट्सवर ते वाहनांच्या विक्रीच्या जाहिराती देऊन लोकांची फसवणूक करत असल्याचेही समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोटो दाखवून ते लष्कराचे शिपाई बनून पैसे उकळत. एसपी तेजस्वानी गौतम यांनी सांगितले की, मेवातमध्ये सेक्सटॉर्शन आणि सायबर फसवणूक करणाऱ्या १९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: Sextortion exposed! More than 1 crore victims of cyber crime, 19 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.