योग शिकवण्याच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण, तोतया शिक्षकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 03:50 PM2022-06-14T15:50:48+5:302022-06-14T16:08:23+5:30
Sexual Abuse : या बनावट शिक्षकाने समुद्रकिनारी आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींचे लैंगिक शोषण केले.
योग शिकवणाऱ्या एका बोगस शिक्षकावर मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन मुलींसोबत लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती 5 महिन्यांपासून हे दुष्कृत्य करत होता. या बनावट शिक्षकाने समुद्रकिनारी आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींचे लैंगिक शोषण केले.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, ही व्यक्ती ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडची रहिवासी आहे. या व्यक्तीने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले, ज्याचे वय 20 वर्षे आहे. आता त्या व्यक्तीला कोर्टात त्याच्यावरील आरोपांना सामोरे जावे लागणार आहे.
या बनावट योग शिक्षकावर महिलांना फिटनेस कसा करायचा हे शिकवण्याच्या नावाखाली अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या व्यक्तीला 19 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. आतापर्यंत त्याच्यावर लैंगिक शोषणाची दोन प्रकरणे समोर आली आहेत.
मात्र, या व्यक्तीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र तो 28 जून रोजी दंडाधिकारी न्यायालयात हजर होणार आहे. क्वीन्सलँडच्या उत्तर भागातील समुद्रकिनाऱ्यावर या व्यक्तीने सर्व गुन्हे केल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.
त्याचवेळी पोलिसांनी लोकांना सांगितले की, या भागात कोणाशीही असे वर्तन झाले असेल तर त्यांनी तक्रार करण्यास पुढे या. याप्रकरणी पोलिसांनी टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे.