दुसऱ्या बायकोच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे ; सावत्र बापाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 09:09 PM2021-02-25T21:09:41+5:302021-02-25T21:10:27+5:30
Molestation : शेगाव शहरातील अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार २०१२ मध्ये तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरे लग्न केले.
शेगाव : दुसऱ्या बायकोच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावत्र बापाला शेगाव शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
शेगाव शहरातील अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार २०१२ मध्ये तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरे लग्न केले. तेव्हापासून अल्पवयीन मुलगी आईसोबतच सावत्र बाप असलेल्या दुसऱ्या व्यक्तीसोबत यांच्या घरीच राहत होती. आई कामानिमित्त बाहेर जात असताना तसेच कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे अल्पवयीन मुलगी घरीच राहत होती. त्यावेळी तिला सावत्र बाप वाईट नजर ठेवत असल्याचे लक्षात आले.
रात्री झोपेत असताना आरोपी हा पीडितेच्या बाजूला येऊन झोपत होता. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. ही बाब पीडितेने आईला सांगितल्यावर तिला तिच्या आजीकडे पाठवून दिले. गुरुवारी पीडिता खासगी कामानिमित्त गांधी चौकातून जोगडी फैलकडे जात असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. तसेच तत्काळ अटक करण्यात आली. अधिक तपास शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.