मुंबईत खळबळ! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार

By पूनम अपराज | Published: November 23, 2020 09:48 PM2020-11-23T21:48:13+5:302020-11-23T21:49:38+5:30

Rape : याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुली ७ आणि ८ वर्षांच्या आहेत.

Sexual abuse on two child showing the lure of chocolate | मुंबईत खळबळ! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार

मुंबईत खळबळ! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार

googlenewsNext
ठळक मुद्दे त्यानुसार याप्रकरणी भा.दं.वि. कलम 376(अ) आणि (ब), 342, 354, सह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पॉक्सो) कलम 3, 6, 8, 10 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मुंबई - धारावी येथे २ चिमुरड्यांना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी नेऊन 30  वर्षीय व्यक्तीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुली ७ आणि ८ वर्षांच्या आहेत.


शनिवारी मुली घरासमोर खेळत असताना आरोपीने मुलींना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी नेले. त्यानंतर खेळण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर एका मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलींनी कुटुंबियांना हा प्रकार सांगितल्यानंतर आरोपीविरोधात धारावी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानुसार याप्रकरणी भा.दं.वि. कलम 376(अ) आणि (ब), 342, 354, सह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पॉक्सो) कलम 3, 6, 8, 10 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

चिमुकल्यांनी आई-वडिलांकडे तक्रार केल्याची माहिती मिळताच आरोपी पसार झाला होता. धारावी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली.आरोपी नोकरी करणारा असून त्याच परिसरातील राहणारा आहे. तसेच एका पीडित मुलीचा नातेवाईकही आहे. त्यामुळे ओळखीचा फायदा उचलून त्याने मुलींना चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले. याप्रकरणी  आरोपीला अटक करण्यात आली. तसेच अधिक तपास असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश नांगरे यांनी दिली. 

Web Title: Sexual abuse on two child showing the lure of chocolate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.