लग्नाचे आमिष दाखवून आठ वर्षांपासून महिलेवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 09:56 PM2020-08-27T21:56:49+5:302020-08-27T22:06:56+5:30
महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अमरावती : एका ४५ वर्षीय इसमाने आठ वर्षांपासून लग्नाचे आमिष देऊन महिलेचे शारीरिक शोषण केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांनुसार, संजय रमेश शर्मा (४५, रा. शारदानगर, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.याने गोपालनगर परिसरातील एका महिलेला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्याशी १० ऑगस्ट २०१२ पासून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वारंवार अत्याचार केला. तिच्या मुलीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी लावून देण्याचे आमिष त्याने दिले. मात्र, २५ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास त्याने महिलेच्या मुलाला रस्त्यात अडवून कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी कलम ३७६ (२) (एन), ४१७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.