लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 10:50 AM2021-05-03T10:50:02+5:302021-05-03T10:50:12+5:30
Crime News : युवतीची फसवणूक केल्याप्रकरणी शेख मोहसीन शेख पाशु या युवकासह अन्य पाच आरोपींवर पाेलिसांनी रविववारी गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : जुन्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर सातत्याने सात वर्षे शारीरिक संबंध प्रस्थापित करून पीडित युवतीची फसवणूक केल्याप्रकरणी शेख मोहसीन शेख पाशु या युवकासह अन्य पाच आरोपींवर पाेलिसांनी रविववारी गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ती आरोग्य सेविका या प्रशिक्षणासाठी कोळसा (ता. सेनगाव) येथे शिक्षण घेत होती. सात वर्षांपूर्वी एका खासगी दवाखान्यात आरोग्य सेविकेचे काम पत्करले. यादरम्यान शेख मोहसीन शेख पाशा हा आपल्या नातेवाईकांना रोज दवाखान्यामध्ये घेऊन येत होता. त्यातून ओळख झाली. कालांतराने ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. रिसोड येथील हॉटेलवर अनेक ठिकाणी भाड्याने खोली करून दोघे एकत्रित राहीले. शारीरिक संबंधासाठी नकार दिला असता त्याने आपल्याला त्याच्या शेतातील घरात नेऊन जबरदस्ती लैंगिक शोषण केले. हा प्रकार सतत सात वर्षे सुरू राहिला, असे पीडीतेने तक्रारीत म्हटले आहे.
अशातच काहीच कल्पना न देता १६ एप्रिल रोजी दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. त्यास याबाबत विचारणा केली असता २७ एप्रिल रोजी बोलायचे आहे, असे सांगून त्याच्या घरी नेऊन दमदाटी केली व जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली. यावेळी त्याच्यासोबत त्याचे आई-वडील व इतरांनीही दमदाटी केली. तू जर दुसरे लग्न केले तर तुला व तुझ्या परिवाराला जीवे मारून टाकीन, अशी धमकीही दिल्याचे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे.अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी व त्यांच्या नातेवाईकांविरूद्ध भादंविचे कलम ३७६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.