मित्राने बोलविल्याचे सांगून लैंगिक अत्याचार, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:39 PM2023-02-06T14:39:41+5:302023-02-06T14:40:39+5:30

घरात झोपलेल्या ७ वर्षीय मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या अर्जुन शिंदे (२५) याने लैंगिक अत्याचार केला. मुलगी ओरडताच चाकूच्या धाकात तिच्यावर अत्याचार केला. 

Sexual assault, beating and death threats by saying that a friend called | मित्राने बोलविल्याचे सांगून लैंगिक अत्याचार, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

मित्राने बोलविल्याचे सांगून लैंगिक अत्याचार, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

Next

मुंबई : मित्राने बोलावल्याचे सांगून मित्रानेच १२ वर्षीय मुलीला मारहाण करत बलात्कार केल्याची घटना सेंट्रल रेल्वे परिसरात घडली. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आहे. 

लोअर परेल परिसरात १२ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. ३ फेब्रुवारीला मोईन शेख हा तिच्या घरी आला. “तेरे को कबीर ने पटरी पे मिलने बुलाया है” असे सांगितले. मुलीने नकार देताच, सोबत नाही आली तर कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. मुलीला जबरदस्तीने सोबत नेले. तिला जबरदस्तीने रेल्वे ट्रॅकच्या बाजूला येण्यास भाग पाडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिने प्रतिकार करताच मारहाण केली. तसेच आपले प्रेमसंबंध असल्याची खोटी माहिती वडिलांना देणार असल्याची धमकी दिली. याबाबत कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगताच आईने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

घाटकोपरमध्ये चिमुकलीवर अत्याचार
घरात झोपलेल्या ७ वर्षीय मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या अर्जुन शिंदे (२५) याने लैंगिक अत्याचार केला. मुलगी ओरडताच चाकूच्या धाकात तिच्यावर अत्याचार केला. 
आई घरी परतल्यानंतर ही बाब समजताच त्यांनी पंतनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत शिंदेला अटक केली आहे. 
शिंदे अभिलेखावरील आरोपी असून, त्याच्या विरोधात चोरी, बलात्कार, विनयभंग, हत्यार बंदी कायद्याचे उल्लंघन अशा स्वरुपाच्या ८ गंभीर गुन्ह्यांची पंतनगर पोलिस ठाण्यात नोंद आहे, तर नेहरूनगर पोलिस ठाण्यातही दोन गुन्हे नोंद आहेत.
 

Web Title: Sexual assault, beating and death threats by saying that a friend called

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.