बलात्कारप्रकरणी तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 06:02 PM2019-08-19T18:02:02+5:302019-08-19T18:04:51+5:30

६ महिन्यांत खटला पूर्ण करण्याचे कोर्टाचे आदेश 

sexual assault case supreme court dismisses tarun tejpal's plea seeking quashing of charge | बलात्कारप्रकरणी तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

बलात्कारप्रकरणी तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Next
ठळक मुद्देतेजपाल यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा खटला सुरू आहे.कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. कनिष्ठ न्यायालयाने ६ महिन्यांत खटल्याचे कामकाज पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली - ‘तहलका’ मासिकाचे संस्थापक तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाने आज  दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तेजपाल यांची कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. तेजपाल यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा खटला सुरू आहे. तसेच गोव्याच्या कनिष्ठ न्यायालयात सुनावणीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने ६ महिन्यांत खटल्याचे कामकाज पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. २०१३ साली तेजपाल यांच्याविरोधात महिला सहकाऱ्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप ठेवण्यात आला आहे. २०१७ साली गोवा येथील कनिष्ठ न्यायालयाने तेजपाल यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले होते. त्या विरोधात तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्याला आव्हान देत याचिका दाखल केली होती. त्यानंतर अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर ३० नोव्हेंबर २०१३ साली तेजपाल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मे २०१४ त्यांची जामिनावर सुटका झाली होती. 

Web Title: sexual assault case supreme court dismisses tarun tejpal's plea seeking quashing of charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.