अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 08:55 PM2022-07-16T20:55:32+5:302022-07-16T20:57:12+5:30

बार्शीटाकळी येथील घटना: विविध कलमांनुसार न्यायालयाने ठोठावली शिक्षा

Sexual assault on minor girl, accused gets life imprisonment | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext

अकोला : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश(विशेष) व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने शनिवारी दुपारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याप्रकरणात बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३७६(२), पोक्सो, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या काकूने ६ एप्रिल २०१४ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी शेतातील विहिरीवर पाणी भरण्यास गेली असता, आरोपी उल्हास पुंजाजी चव्हाण याने मुलीला बळजबरीने उचलून जवळील एका नाल्यात नेले. याठिकाणी त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. बराच वेळ होऊनही मुलगी परतली नसल्याने, काकूसह इतर महिला तिला शोधण्यासाठी गेल्या असता, त्यांना आरोपी उल्हास चव्हाण हा मुलीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे दिसून आले. महिलांना पाहून आरोपी पळून गेला. याप्रकरणात बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३७६(२), पोक्सो, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Web Title: Sexual assault on minor girl, accused gets life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.