तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार, मारहाण करून लुटले; सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 09:27 AM2021-06-01T09:27:19+5:302021-06-01T09:28:00+5:30

Crime News: एकमेकांचे गट सोडल्याने तृतीयपंथीयांमध्ये वाद झाला. त्यातून दोन जणांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल व रोकड जबरदस्तीने काढून घेतली. तसेच लैंगिक अत्याचार केले.

Sexual harassment, beatings and robbery of Third gender; Filed charges against seven people | तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार, मारहाण करून लुटले; सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार, मारहाण करून लुटले; सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

Next

पिंपरी : एकमेकांचे गट सोडल्याने तृतीयपंथीयांमध्ये वाद झाला. त्यातून दोन जणांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल व रोकड जबरदस्तीने काढून घेतली. तसेच लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरगाव येथे सोमवारी (दि. ३१) ही घटना घडली.

याप्रकरणी तृतीय पंथी व्यक्तीने फिर्याद दिली आहे. रुक्सार उर्फ इरफान इन्साफ खान, आजम शेख (दोघेही रा. गोवंडी इस्ट, मुबई),  अनम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), सिमरन उर्फ पवन (पूर्ण नाव माहीत नाही, रा. गोवंडी इस्ट, मुंबई) व तीन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी आजम शेख हा आरोपी रुक्सार खान हिचा पती आहे. तसेच रुक्सार खानसह इतर आरोपी व फिर्यादी हे तृतीय पंथी आहेत. एकमेकांचे गट सोडून आल्याने त्यांच्यात वाद आहे. आरोपी रुक्सार खान ही फिर्यादीची पूर्वीची गुरू आहे. 

आरोपींनी फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला चाॅपर उलटा मारून जखमी केले. तसेच फिर्यादी व तिच्या मैत्रिणीकडील मोबाईल तसेच फिर्यादीकडील ३० हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच आरोपी आजम याने फिर्यादीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केले. पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप तपास करीत आहेत.

Web Title: Sexual harassment, beatings and robbery of Third gender; Filed charges against seven people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.