स्लमडॉग मिलियनेयरमधील अभिनेता मधुर मित्तलविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा 

By पूनम अपराज | Published: February 24, 2021 05:05 PM2021-02-24T17:05:55+5:302021-02-24T17:08:33+5:30

Sexual harassment : ही घटना १३ फेब्रुवारी २०२१ रोजी घडली. शाका लका बूम बूमच्या  अभिनेत्याने फिर्यादीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Sexual harassment case against Slumdog Millionaire actor Madhur Mittal | स्लमडॉग मिलियनेयरमधील अभिनेता मधुर मित्तलविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा 

स्लमडॉग मिलियनेयरमधील अभिनेता मधुर मित्तलविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा 

Next
ठळक मुद्दे तक्रारदार महिला वांद्रे येथील रहिवासी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मधुर मित्तल याची तिच्यासोबत भेट झाली. नंतर मधुर मित्तल याने पंधरवड्यातच दारूच्या नशेत तिच्यावर जबरदस्ती केली असल्याचे तक्रारदार महिलेचे वकील निरंजनी शेट्टी यांनी उघड केले.

स्लमडॉग मिलियनेयर या सिनेमात ज्याने समीर मलिकची भूमिका साकारली त्या अभिनेत्याविरोधात खार पोलिसांनी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. मधुर मित्तल हे या अभिनेताचं नाव आहे, फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, अभिनेत्याने तिच्या घरी एक्स गर्लफ्रेंडला मारहाण केली होती. आता पोलिस चौकशी सुरू आहे.  पोलिसांनी याबाबत सांगितले की, ही घटना १३ फेब्रुवारी २०२१ रोजी घडली. शाका लका बूम बूमच्या  अभिनेत्याने फिर्यादीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

तक्रारदार महिला वांद्रे येथील रहिवासी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मधुर मित्तल याची तिच्यासोबत भेट झाली. नंतर मधुर मित्तल याने पंधरवड्यातच दारूच्या नशेत तिच्यावर जबरदस्ती केली असल्याचे तक्रारदार महिलेचे वकील निरंजनी शेट्टी यांनी उघड केले. शिवाय, फिर्यादीच्या वकिलाने असे सांगितले की, तिने ११ फेब्रुवारीला त्याच्याशी सर्व संबंध तोडले होते आणि दोन दिवसानंतर, तिच्यावर त्याने हल्ला केला.

"मधुर मित्तल संतापलेला होता. तो माझ्या क्लायंटच्या खोलीत आला आणि तिला बोलण्याची संधी न देता १५ पेक्षा जास्त वेळा तिच्या कानाखाली लगावली, तिला अनेकदा मारहाण केली, केस खेचले, शारीरिक अत्याचार केला आणि तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा लैंगिक अत्याचार त्याने केला होता. तिच्या चेहऱ्यावर, मान, छाती, हात, पाठ आणि कान, डोळे यांना जखमा झाल्या आहेत," असे पुढे वकील म्हणाले.

 

भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा 

 

१५ फेब्रुवारी रोजी मित्तल हा पीडित महिलेच्या निवासस्थानाखाली आढळून आला होता, परंतु शेट्टी यांनी त्यांना बोलावून समज दिली. फ्री प्रेस जर्नलच्या बातमीत असे म्हटले आहे की, त्याच्यावर विनयभंग, लैंगिक छळ आणि अत्याचार यासाठी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने मधुर मित्तलविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. मधुर मित्तल सध्या जयपूरमध्ये एका डिजिटल सिरीजच्या शूटिंगमध्ये आहे.

Web Title: Sexual harassment case against Slumdog Millionaire actor Madhur Mittal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.