वरळीत पोलीस हवालदाराकडून बालिकेचा लैंगिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:57 AM2019-09-30T05:57:02+5:302019-09-30T05:57:54+5:30

समाजाच्या रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या एका पोलीस हवालदारानेच बालिकेचा लैंगिंक छळ केल्याची धक्कादायक घटना येथील वरळी पोलीस वसाहतीत घडली आहे.

 Sexual harassment of girl by police constable in Worli | वरळीत पोलीस हवालदाराकडून बालिकेचा लैंगिक छळ

वरळीत पोलीस हवालदाराकडून बालिकेचा लैंगिक छळ

Next

- जमीर काझी
मुंबई : समाजाच्या रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या एका पोलीस हवालदारानेच बालिकेचा लैंगिंक छळ केल्याची धक्कादायक घटना
येथील वरळी पोलीस वसाहतीत घडली आहे. विशेष बाब म्हणजे, सोबत काम करत असलेल्या
एका सहकारी पोलिसाच्या १२ वर्षांच्या मुलीशी त्याने दुष्कृत्य केले आहे. उमेश शिरसाठ (४३) असे त्याचे नाव असून, या प्रकरणी वरळी पोलिसांनी विनयभंग व लैंगिक अपराधापासून बालसुरक्षा अधिनियम कलम २०१२(पॉस्को)अन्वये कारवाई केली आहे. मलबार हिल वाहतूक नियंत्रण शाखेत नियुक्तीला असलेला शिरसाठ हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
वरळी पोलीस वसाहतीत उमेश शिरसाठ राहत असून, मलबार हिल ट्रॅफिक चौकीत तो नियुक्तीला आहे. बारा वर्षांच्या मनिषाचे (बदललेले नाव) वडीलही त्याच चौकीत नियुक्तीला असून, वरळी कॅम्पात राहतात. त्यांचे पत्नीशी
भांडण झाल्याने काही महिन्यांपासून एका मुलीला सोबत घेऊन ती अन्यत्र राहते, तर ते त्यांची आई, मुलगी मनिषा व मुलगा पोलीस वसाहतीत राहतात. १४ सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास मनिषाची आजी किराणा दुकानात गेली होती. तेव्हा उमेश हा पीडित मुलीच्या घरी आला. ‘मनिषा, तुझ्या आईने तुझ्यासाठी जीन्स घेतल्या आहेत, तू तिच्याकडे का जात नाहीस,’ असे सांगत तिचा हात पकडला. तिला अश्लीलपणे स्पर्श करू लागला. मनिषा कशीबशी स्वत:ची सुटका केली. घाबरलेल्या अवस्थेत बघून तिच्या आजीने विचारले असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर, त्यांनी त्याच रात्री पोलीस ठाण्यात जात शिरसाठविरुद्ध तक्रार दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी शिरसाठला मध्यरात्री एकच्या सुमारास अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, सोमवारी त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अधिकाºयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ

पोलिसावर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये हे लाजिरवाणे कृत्य खरोखरच घडले आहे की, त्यामागे नेमके अन्य काही कारण आहे, याबाबत वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वर्पे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी आपण बैठकीत आहोत, नंतर कळवितो, असे सांगून फोन कट केला. त्यानंतर, फोन घेतलाही नाही, तसेच मोबाइलवर मेसेज करून विचारले असता काहीही रिप्लाय दिला नाही.

Web Title:  Sexual harassment of girl by police constable in Worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.