एनआयएच्या महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 15:40 IST2023-05-18T15:39:53+5:302023-05-18T15:40:15+5:30
आरोपीचे नाव गौरव आवळे (३१) असे असून तो सांगलीच्या मिरजचा रहिवासी आहे.

एनआयएच्या महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) मुंबई येथे तैनात असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचे भासवून तिची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव गौरव आवळे (३१) असे असून तो सांगलीच्या मिरजचा रहिवासी आहे.
आवळेने स्वतःची ओळख गुप्तचर अधिकारी म्हणून करून दिली. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप आहे. नंतर आवळेने तिला पोलिसांच्या पतसंस्थेकडून कर्ज घेण्यास भाग पाडले आणि तिच्या नावावर पैसे उकळले. तसेच १३ तोळे सोनेही घेतले. आरोपीचा तिच्याशी लग्न करण्याचा इरादा नसल्याचे समजले तेव्हा महिलेने पैसे परत मागितले. पण, त्याने तिला पैसे परत करण्यास नकार दिला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.